Goa Government Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! कर्मचारी भरती आयोगाकडून जाहिरात प्रसिद्ध, कसा कराल अर्ज? जाणून घ्या

GSSC job vacancies 2025: गोवा कर्मचारी भरती आयोगानं (Goa Staff Selection Commission - GSSC) विविध सरकारी विभागांतील ३९० हून अधिक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे.
Goa Government Job
Goa Government JobDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गोवा कर्मचारी भरती आयोगानं (Goa Staff Selection Commission - GSSC) विविध सरकारी विभागांतील ३९० हून अधिक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये सहाय्यक शिक्षक, पोलीस उपनिरीक्षक (PSI), लिपिक (TA), इंग्रजी शिक्षक आदी विविध पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांना २३ मे २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.

या भरती प्रक्रियेत एकूण ३९० हून अधिक पदांचा समावेश असून त्यामध्ये विविध विभागांमधील रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

यामध्ये शिक्षण विभागासाठी ११८ सहाय्यक शिक्षक, पोलीस विभागासाठी १८७ पोलीस उपनिरीक्षक (PSI), प्रशासन व कार्यालयीन कामकाजासाठी ६१ लिपिक (TA) आणि उच्च माध्यमिक शिक्षणासाठी १४ इंग्रजी शिक्षक पदांचा समावेश आहे. ही पदे विविध शासकीय विभागांतर्गत असून गोव्यातील उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे.

Goa Government Job
Goa Mango Price: हापूस 500, तर माणकुराद अजूनही 1500; गावठी आंब्‍याची आवक कमी

या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी २३ मे २०२५ पर्यंत आपला अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. अर्ज आणि भरतीसंबंधी संपूर्ण माहिती, अटी व पात्रता निकषांसाठी उमेदवारांनी http://gssc.goa.gov.in या आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

Goa Government Job
Goa Politics: खरी कुजबुज; रस्‍त्‍याला डांबर कधी फासणार?

उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन संपूर्ण जाहिरात, पात्रता निकष, वयोमर्यादा, अर्ज पद्धत आणि परीक्षा पद्धती यासंबंधी माहिती वाचावी. ही भरती गोव्यातील युवकांसाठी एक सुवर्णसंधी असून शासकीय सेवेत नोकरी करण्याची संधी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com