Shree Devi Lairai Jatrotsav
Shree Devi LairaiDainik Gomantak

Devi Lairai: गोव्याची समृद्धीकडे वाटचाल व्हावी; CM सावंतांची श्री लईराई देवीच्या चरणी प्रार्थना

Shree Devi Lairai Jatrotsav: गोव्याची समृद्धीकडे वाटचाल व्हावी, अशी प्रार्थनाही करून, जत्रेची परंपरा जपणाऱ्या देवीच्या लाखो व्रतस्थ भक्तगणांना शुभेच्छा दिल्या.
Published on

डिचोली: देश विकसित करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पपूर्ती होतानाच, देशावर सध्या जे संकट आले आहे. त्याचे श्री लईराई देवी निश्चितच निवारण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी श्री लईराई देवीचे दर्शन घेतल्यानंतर व्यक्त केला.

गोव्याची समृद्धीकडे वाटचाल व्हावी, अशी प्रार्थनाही करून, जत्रेची परंपरा जपणाऱ्या देवीच्या लाखो व्रतस्थ भक्तगणांना शुभेच्छा दिल्या. लईराई देवीच्या जत्रोत्सवानिमित्त मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पत्नी सुलक्षणा सावंत यांच्यासह आज (शुक्रवारी) सकाळी शिरगाव येथे जाऊन देवीचे दर्शन घेऊन देवीच्या चरणी सेवा अर्पण केली.

Shree Devi Lairai Jatrotsav
Pakistani Flag: पाकिस्तानी झेंड्यावरुन गोव्यात रंगले राजकारण; भाजपची पोलिसांत तक्रार, काँग्रेसचाही आक्षेप

गोमंतकीय जनतेची सेवा करण्यासाठी लईराई देवी मुख्यमंत्र्यांना बळ देवो, असे गाऱ्हाणे देवस्थान समितीतर्फे घालण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे मंदिरात आगमन होताच देवीच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी उसळली होती. त्यामुळे काही क्षणांपुरते मंदिराच्या गर्भगृहाचे गेट बंद ठेवण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com