Goa BJP Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: पाऊसकर भाजपच्या उंबरठ्यावर

दैनिक गोमन्तक

Goa Politics:

सावर्डे मतदारसंघाचे माजी आमदार आणि सार्वजनिक बांधकाम खात्‍याचे माजी मंत्री दीपक पाऊसकर हे आपल्‍या कार्यकर्त्यांसह लवकरच भाजप प्रवेश करणार असून याच दिवशी दाबाळीचे माजी सरपंच रमाकांत गावकर, त्‍यांचे ज्‍येष्‍ठ बंधू भोलो गावकर तसेच कुळेचे माजी सरपंच मणि लांबोर हेही आपल्‍या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

लोकसभा निवडणूक डोळ्‍यासमोर ठेवून या सर्व नेत्‍यांना भाजपमध्ये प्रवेश देण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे या मतदारसंघात भाजपचे बळ अधिक प्रमाणात वाढू शकेल. या नेत्‍यांचा भाजप प्रवेश 5 किंवा ६ मार्च रोजी होणार अशी शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहे. या शक्‍यतेला भाजपच्‍या स्‍थानिक नेत्‍यांकडून दुजोरा मिळत आहे.

2017 च्‍या विधानसभा निवडणुकीत पाऊसकर हे मगोच्‍या उमेदवारीवर सावर्डे मतदारसंघातून आमदार म्‍हणून जिंकून आले होते. त्‍यानंतर त्‍यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. प्रमोद सावंत सरकारात त्‍यांना सार्वजनिक बांधकाम खाते देण्‍यात आले होते.

मात्र, 2022 च्‍या निवडणुकीत भाजपने पाऊसकरांना तिकीट नाकारल्‍याने त्‍यांनी अपक्ष म्‍हणून निवडणूक लढविली होती. अपक्ष म्‍हणून निवडणूक लढवूनही त्‍यांनी या निवडणुकीत बऱ्यापैकी मते घेतली होती.

2019 च्‍या लोकसभा निवडणुकीत सावर्डे मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार फ्रान्‍सिस सार्दिन यांनी अनपेक्षितरीत्या ६ हजार मते घेतली होती. यंदाच्‍या लोकसभा निवडणुकीत भाजपच्‍या मतात अशी फूट पडू नये यासाठी पक्षाने या सर्व नेत्‍यांना पुन्‍हा पक्षात घेण्‍याचे ठरविले आहे.

‘सावर्डेत 20 हजार मतांच्या आघाडीचे लक्ष्य’

सावर्डे मतदारसंघाचे भाजप मंडळ अध्‍यक्ष विलास देसाई यांना विचारले असता, जे कोण भाजप पक्षात प्रवेश करणार आहेत ते मूळ भाजपचेच कार्यकर्ते आहेत. काही कारणांमुळे ते भाजपपासून दूर गेले होते.

आता ते जर पुन्‍हा भाजपमध्ये येत असतील, तर त्‍यांचे स्‍वागतच आहे. लोकसभा निवडणुकीत सावर्डे मतदारसंघातून भाजप उमेदवाराला किमान २० हजार मतांची आघाडी मिळवून देणे हे आमचे लक्ष्‍य आहे. हे नेते पक्षात आल्‍यास हे उद्दिष्ट आम्‍ही सहजपणे पार करू, असे त्‍यांनी सांगितले.

भाजपमध्ये येणाऱ्यांचे स्वागतच: विनय तेंडुलकर

माजी खासदार विनय तेंडुलकर यांनी या प्रवेशाच्‍या वृत्ताला दुजोरा देताना, फक्‍त पाऊसकरच नव्‍हे, तर आणखी काही नेते मोठ्या संख्‍येने आपल्‍या कार्यकर्त्यांना घेऊन भाजप प्रवेश करणार आहेत. भाजप पक्षात जे कोण प्रवेश करणार त्‍यांचे स्‍वागत करण्‍याचे धोरण पक्ष नेतृत्‍वाने स्‍वीकारले आहे, असे त्‍यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT