Goa Lokotsav  Dainik Gomantak
गोवा

Lokotsav 2023: स्वच्छता राखा! लोकोत्सवातील फुड स्टॉलवर FDA चा छापा

कलाकारांना, हस्तकारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.

Pramod Yadav

पश्‍चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर व कला व संस्कृती संचालनालयाद्वारे दर्यासंगम कला अकादमी येथे ‘लोकोत्सव 2023’ आयोजित करण्यात आला आहे. कलाकारांना, हस्तकारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.

मागील सहा ते सात दिवसांपासून सुरू असलेल्या या महोत्सवात विविध फुड स्टॉल देखील उभारण्यात आले आहेत. दरम्यान, या फुड स्टॉलची पाहणी अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात आली.

यावेळी एका फुड स्टॉलवर अन्न आणि औषध प्रशासनाने छापा मारून स्टॉल बंद पाडून खाद्यपदार्थ विकण्यास मनाई केली. या स्टॉलवर अन्न बनविण्यासाठी पुरेशी स्वच्छता आणि खबरदारी घेण्यात आली नव्हती असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

दरम्यान, स्टॉल धारकाला स्वच्छतेची संपूर्ण काळजी घेऊन त्यानंतरच स्टॉल सुरू करावा अशी सुचना करण्यात आली आहे.

लोकोत्सवाच्या माध्यमातून आपली हस्तकला लोकसंस्कृती, खाद्यसंस्कृतीला व्यासपीठ मिळत आहे. देशभरात कला आणि हस्तकला एकत्र आल्याने कोविड महामारीनंतर लोकोत्सवाच्या माध्यमातून लोकसंगम आणि कलासंगम दिसून येत आहे.

लोकोत्सवात विविध हस्तकला, कपडे, खेळणी यासह विविध गोष्टी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय विविध कलादर्शन देखील या लोकत्सवात पाहायला मिळत आहे. अनेक देशी-विदेशी पर्यटक लोकत्सवाला भेट देत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT