CM Dev Darshan Yatra scheme
CM Dev Darshan Yatra schemeDainik Gomantak

Vasco News : गोव्याचे भाविक चालले तिरुपतीला; आमदार संकल्प आमोणकरांनी दाखवला हिरवा झेंडा

900 भाविकांचा समुह वास्को रेल्वे स्थानकातून तिरुपतीला रवाना
Published on

Vasco News : मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देव दर्शन यात्रा योजनेंतर्गत वास्को रेल्वे स्थानकातून तिरुपतीकडे निघालेल्या सुमारे 900 भाविकांच्या समुहाला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.

आमोणकर यांच्यासह त्यांच्या पत्नी व नगरसेवक श्रद्धा आमोणकर आदींनी वास्को रेल्वे स्थानकावर भाविकांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

CM Dev Darshan Yatra scheme
Margao Drugs Case: अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी ठाण्यातील युवकाला अटक; 40 हजार रुपयांचे एलएसडी पेपर्स जप्त

मुरगाव मतदारसंघातील अनेक कुटुंबांना, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना लाभ झालेल्या या योजनेबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्याबद्दल आमोणकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

अशा योजना समाजात एकता आणि धार्मिक कल्याण वाढवतात. या योजना प्रत्येकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत जेणेकरून त्यांना धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळेल. या योजनेमुळे बरेच लोक आनंदी झाले आहेत.

कारण ते कोणतेही पैसे खर्च न करता धार्मिक स्थळांना भेट देण्यास भाग्यवान समजतात आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण सहलीचे नियोजन व्यवस्थित ठेवले आहे. या ग्रुपमधील 900 भाविकांतील सुमारे 90 टक्के भक्त यापूर्वी कधीही तिरुपतीला गेले नाहीत.

CM Dev Darshan Yatra scheme
Goa Education: शिक्षण खात्‍याचा गोंधळ; गणवेश, रेनकोटचा 3 वर्षे पत्ताच नाही

भक्तांना ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सरकारला आशीर्वाद दिले आहेत. ही ट्रेन आता वास्कोहून मडगावला जाणार आहे आणि तिरुपतीला जाणार्‍या ट्रेनला मडगावहून समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात येईल, असे आमोणकर यांनी सांगितले.

ज्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मुख्यमंत्री देव दर्शन यात्रा योजना आणि त्याचे फायदे लोकांना सांगितले त्यामुळे आमोणकर यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com