डॉ. अशोक आमशेकर, प्रकाश गाडगीळ gomantak digital team
गोवा

Valpoi News : जनभागीदारीतून मुलांचा पंचकोशात्मक विकास

गजानन देसाई : वाळपईत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर मार्गदर्शन

गोमंतक ऑनलाईन टीम

वाळपई : प्राथमिक अवस्थेत मुलांची जडण घडण होण्यासाठी पंचकोशात्मक विकास झाला पाहिजे. मनोमय कोश, प्राणायाम कोश, अन्न कोश, विज्ञान कोश, आनंदमय कोश अशातून जडण घडण झाली तर विकास होतो. त्यासाठी पालकांचा सहभाग गरजेचा आहे.

त्यामुळेच पालकांच्या जनभागीदारीतूनच मुलांचा पंचकोशात्मक विकास होणार आहे, असे प्रतिपादन शिक्षण मंत्रालयाच्या समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या जनभागीदारी उपक्रमाचे राज्य समन्वयक गजानन देसाई यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विषयावर बोलताना केले.

वाळपई येथे काणेकर सभामंडपात डॉ. केशव बळीराम हेडगेवार विद्यालयाच्या पालकांसाठी जनभागीदारी कार्यक्रम रविवारी सकाळी घेण्यात आला. यावेळी डॉ. हेडगेवार शाळेचे अध्यक्ष डॉ. अशोक आमशेकर, सचिव प्रकाश गाडगीळ, पालक ॲड. कृत्तिका चोर्लेकर, मुख्याध्यापिका निलांगी शिंदे उपस्थित होत्या.

गजानन देसाई म्हणाले, पूर्वी दहावी, बारावी, पदवी अशी शैक्षणिक नियमावली होती. त्यात आता बदल होत अंगणवाडी, पहिली, दुसरी एक टप्पा, तिसरी, ४ थी पाचवी दुसरा टप्पा, ६ वी, ७ वी ८ वी तिसरा टप्पा, ९ वी, १० वी, ११ वी १२ वी असा चौथा टप्पा असणार आहे. या उपक्रमात सुमारे १.५ कोटी मुले, शिक्षक सहभागी होत आहेत. मुलांचा पाच वर्षे पंचकोशात्मक प्रवास झालाच पाहिजे. प्रकाश गाडगीळ यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT