Valpoi : ब्रह्माकरमळीतील नागरिकांत समाधान; नवीन पूल वाहतुकीसाठी खुला

मंत्र्यांच्या प्रयत्नांना यश : ब्रह्माकरमळीतील नागरिकांत समाधान
Construction of a Bridge
Construction of a BridgeGomantak Digital Team
Published on
Updated on

Valpoi : ब्रह्माकरमळी-सत्तरी येथील व नगरगाव पंचायत क्षेत्राला जोडणाऱ्या महत्त्वाच्या अशा नवीन पुलाचे बांधकाम अखेर पूर्ण झाले आहे. आता हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.हा पूल अरुंद व जुना होता व तो मोडकळीस आला होता. ब्रह्माकरमळी, शेळप, नानेली, शिंगणे या भागात जाण्यासाठी या पुलाचा वापर केला जातो.

गेल्या अनेक वर्षांपासून या अरुंद पुलाच्या जागी नवीन पुलाचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी होती. यासंदर्भात वाळपई सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने सरकाला प्रस्ताव सादर केल्यानंतर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या प्रयत्नांनी या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. व एप्रिलमध्ये या पुलाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली.

Construction of a Bridge
Valpoi : बहुपयोगी कृषी यंत्रांमुळे शेतकऱ्यांना फायदा; संदीप केळकर यांच्या यंत्राचे उद्‍घाटन

पुलाचे बांधकाम सुरू होते तेव्हा शिंगणे व नानेली, शेळप व ब्रह्माकरमळी या गावांमध्ये जाण्यासाठीचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता व नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून तात्पुरती या मार्गावरील वाहतूक व्यवस्था नगरगाव-हेदोडे लईराई मंदिरापासून वाळवंट-ब्रह्माकरमळी यामार्गे वळविण्यात आली होती. मात्र सदर रस्ता अरुंद व आडमोडी वाट असल्याने अनेकांना अपघातास सामोरे जावे लागत होते.

Construction of a Bridge
Valpoi News : घरबसल्या मिळतोय तांदूळ, मग शेतात जायचेच कशाला?

ब्रह्मकरमळीचा रस्ता जर वेळीच पूर्ण झाला नसता तर पावसाळ्यात नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागला असता. त्यामुळे आमदार व सरपंच यांच्या प्रयत्नांनी या पुलाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण केले आहे. त्यामुळे गावातील नागिरकांनी सरपंच व आमदारांचे आभार मानले व समाधान व्यक्त केले.

आमदार विश्वजीत राणे सत्तरीचा विकास करताना नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून विशेष काळजी घेत आहेत. आज त्यांच्या प्रयत्नांनी हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला. येणाऱ्या दिवसांत नगरगाव पंचायतीत अनेक विकासकामे मार्गी लागणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. आज गावातील या पुलाचे बांधकाम वेळीच पूर्ण झाल्याबद्दल समाधान आहे. कारण पावसाळ्यात जर हा पूल झाला नसता तर मोठी गैरसोय झाली असती.

- संध्या खाडीलकर, सरपंच, नगरगाव

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com