Fire to house in Durbhat Dainik Gomantak
गोवा

दुर्भाटमध्ये घराला भीषण आग, घातपाताचा संशय

आगीत लाखोंचं नुकसान झाल्याचा अंदाज, आग लावल्याच्या संशयातून एकाला घेतलं ताब्यात

दैनिक गोमन्तक

फोंडा : फोंडा परिसरातील दुर्भाट येथे घराला अचानक आग लागल्याने मोठं नुकसान झालं आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी लागलेली विझवली असली तरीही लाखोंचं नुकसान झाल्याचं बोललं जात आहे. ही आग लागली की लावली असा संशय आता बळावू लागला आहे. याच संशयातून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे. (Fire to house in Durbhat News Updates)

फोंड्याजवळील (Ponda) दुर्भाट येथे एका घलाला आग लागल्याची घटना घडली आहे. आगीत घराचे मोठे नुकसान झालं असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. दरम्यान ही आग लावल्याच्या संशयाने पोलिसांनी एकाला ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे.

दरम्यान पेडणे (Pernem) येथील हरिजन वाड्यामध्ये एका घराला रविवारी आग लागली. पेडणे अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, नियंत्रण कक्षाला संध्याकाळी 6.30 वाजता एका घराला आग लागल्याची माहिती देण्यात आली. तात्काळ अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर (Fire) नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. या आगीत 3 लाखांचे नुकसान झाल्याचा दावा घरमालकाने केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Waste Management Project: गोव्यातील दोन कचरा प्रकल्प रखडले! बायंगिणीला कोर्टाचा अडथळा, वेर्णाला पर्यावरण मंजुरीची प्रतीक्षा

River Pollution: म्हापसा नदीच्या पाण्यात फिकल कोलिफॉर्म 17 पट जास्त! प्रदूषणाच्या अहवालाने चिंता वाढवली

Baba Vanga Prediction: 2026 संपण्यापूर्वी जगाचा विनाश होणार? बाबा वेंगा यांच्या कथित भविष्यवाणीने जगभरात खळबळ, नेमकं काय सांगितलंय भाकितात?

खरी कुजबुज: 'तो' आवाज कुणाचा?

Abhishek Sharma Record: 69 षटकार... अभिषेक शर्माची ऐतिहासिक कामगिरी! सूर्यकुमार यादवचा 4 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, केली 'ही' मोठी कामगिरी

SCROLL FOR NEXT