Stringent provisions in the law for crimes against women crime

 

Dainik Gomantak

गोवा

Siddhi Naik Case: तब्बल साडेचार महिन्यांनंतर खुनाचा गुन्हा दाखल

नास्नोळा येथील सिद्धी नाईक मृत्यूप्रकरणी अखेर कारवाई

दैनिक गोमन्तक

म्हापसा : नास्नोळा येथील सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणात कळंगुट पोलिसांनी अखेर तब्बल साडेचार महिन्यांनंतर अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. सिद्धी नाईकचे वडील संदीप नाईक यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा (Crime) नोंद झाला आहे. सिद्धीला समुद्रात बुडवून तिचा खून केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी मंगळवारी गुन्हा नोंद केल्याची माहिती आहे.

11 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी सिद्धी नाईक नावाची तरुणी गिरी येथील ग्रीन पार्क जंक्शनवरून बेपत्ता झाली होती. सिद्धी पर्वरी (Porvorim) येथील एका मॉलमध्ये कामाला जात होती. तिच्या वडिलांनी म्हापशाजवळील ग्रीन पार्क जंक्शनवर तिला एका प्रवासी बसमध्ये बसवून दिले होते. पण सिद्धी त्या दिवशी कामावर पोहोचलीच नाही

सिद्धी कामावर पोहोचलीच नसल्याचे समजताच तिच्या वडिलांनी शोधाशोध सुरु केली. यानंतर त्यांनी म्हापसा पोलिसांत धाव घेत सिद्धी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी पहाटे सिद्धीचा मृतदेह कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर विवस्त्र अवस्थेत सापडला होता.

सिद्धी नाईक हत्याप्रकरणावरुन (Murder) राज्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापले होते. कायदा-सुव्यवस्थेचे कारण पुढे करत विरोधकांनी यावरून सरकारवर हल्लाबोलही केला होता. सुरुवातीला सिद्धीच्या वडिलांनी याप्रकरणी थांबण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सिद्धीच्या मृतदेहाचे विच्छेदनही करण्यात आले होते.

मात्र त्यानंतर 4 सप्टेंबर रोजी आपल्या मुलीचा घातपात झाल्याचा संशय सिद्धीच्या वडिलांनी व्यक्त केला होता. यानंतर त्यांनी कळंगुट पोलिसांत अज्ञाताविरुद्ध लेखी तक्रार दाखल केली होती. शवविच्छेदन अहवालानुसार सिद्धीच्या शरीरावर तीन मोठ्या जखमा होत्या. त्यातील दोन जखमा पायांवर, तर इतर ठिकाणी एक जखम आढळली होती. या तिन्ही जखमा मृत्यूपूर्वीच्या होत्या. तसेच सिद्धीच्या पोटात पाणी मिळाले नव्हते. पण वाळूचे कण तिच्या स्वरतंतूच्या मागे सापडले होते.

दरम्यान या तक्रारीच्या आधारे कळंगुट (Calangute) पोलिसांनी गोमेकॉच्या डीनना पत्र पाठवून सिद्धीच्या शवविच्छेदन अहवालाच्या आधारे तज्ज्ञ वैद्यकीय पथकाकडून विश्लेषण अहवाल तयार करावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार गोमेकॉने तज्ज्ञ समिती नियुक्त करून अहवालाचे विश्लेषणही केले होते. या दरम्यान अनेक सामाजिक संस्था व राजकीय पक्षांनी हे प्रकरण घातपाताचे असल्याचा दावा करीत मोर्चे, निषेध सभा व मेणबत्ती फेर्यांचे राज्यभर आयोजन केले. अखेर 28 डिसेंबर रोजी सिद्धी नाईक मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा (Crime) नोंद करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT