Nagesh Karmali Dainik Gomantak
गोवा

Nagesh Karmali: स्वातंत्र्यसैनिक करमली अनंतात विलीन; विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आदरांजली

सांतिनेज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

गोमन्तक डिजिटल टीम

Nagesh Karmali: गोवा मुक्तीलढ्यात अग्रणी, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, साहित्यिक नागेश करमली यांच्यावर आज सकाळी सांतिनेज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सभापती रमेश तवडकर यांच्यासह राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना आदरांजली वाहिली.

तत्पूर्वी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी त्यांच्या रायबंदर येथील राहत्या घरी जाऊन अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या समवेत उपस्थित होते. 5 फेब्रुवारी रोजी त्यांच्या वाढदिवसादिवशी प्रकृती बिघडल्याने त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी आणण्यात आले होते. काल गुरुवारी सकाळी त्यांचे निधन झाले.

आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कालपासून अंत्यदर्शनासाठी त्यांचा मृतदेह त्यांच्या घरी ठेवण्यात आला होता. त्यानंतर तिथूनच त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर सांतिनेज स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांचा मुलगा रामदास करमली यांनी भडाग्नी दिला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक एन. शिवदास, दिलीप बोरकर, गोमन्तकचे संचालक- संपादक राजू नायक, मये संघर्ष समितीचे सखाराम पेडणेकर, काशिनाथ मयेकर, पांडुरंग फळदेसाई रामराव वाघ, सुभाष वेलिंगकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मिकांत पार्सेकर, पत्रकार प्रकाश तळवणेकर उपस्थित होते.

स्व. करमली यांनी गोवा मुक्तीलढ्यात जुलमी पोर्तुगीज राजवटीविरुद्ध जागृती निर्माण करण्यासाठी निर्भयपणे कार्य केले. कोकणी भाषा मंडळाचे संस्थापक सदस्य होते. त्यांनी गोवा मुक्तीनंतर कोकणी भाषेला मान्यता मिळावी यासाठी सतत कार्य केली. कोकणी साहित्यात त्यांचे योगदान मोलाचे आहे.

डॉ. प्रमोद सावंत , मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT