Ponda News Dainik Gomantak
गोवा

Ponda News: ढवळी येथील भंगारअड्ड्यातच ठोकलाय तळ, जेवण तिथेच रसायनांचे बॅरल्सही

गैरप्रकार उघडकीसः सरकारी अधिकाऱ्यांसह कवळे पंचायत मंडळाकडून पाहणी

गोमन्तक डिजिटल टीम

कवळे पंचायतीच्या प्रत्येक ग्रामसभेत उपस्थित होणाऱ्या उपस्थित होणाऱ्या ढवळी भागातील बेकायदा भंगारअड्ड्यांची आज (गुरुवारी) अखेर सरकारी अधिकाऱ्यांनी पंचायत मंडळाच्या उपस्थितीत तपासणी केली. यासंबंधीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

विशेष म्हणजे या भंगारअड्ड्यांच्या ठिकाणीच कामगारांची निवास व्यवस्था करण्यात आली असून विविध तऱ्हेच्या रसायनांच्या बॅरल आणि इतर साहित्याजवळच गॅस सिलिंडर ठेवून जेवण तयार केले जात असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. एकंदर अनेक गैरप्रकार या तपासणीत उघड झाले आहेत.

ढवळी भागातील बेकायदा भंगारअड्ड्यांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. कवळे पंचायतीच्या ग्रामसभेत तर हा भंगारअड्ड्यांचा प्रश्‍न कायम चर्चेला येत असतो.

ग्रामसभेतील चर्चा आणि ठरावानुसार पंचायतीने या भंगारअड्ड्यांविरुद्ध कारवाई सुरू केली की भंगारअड्ड्यांचे मालक न्यायालयात जाऊन पंचायतीच्या आदेशाला स्थगिती देतात, त्यामुळे या भंगारअड्ड्यांवर कारवाई करणे मुश्‍किलीचे ठरले होते.

गॅस सिलिंडरमुळे भीती!

या भंगारअड्ड्यांवरच कामगारांची राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. हे कामगार आपल्या कुटुंबासह या भंगारअड्ड्यातच राहतात आणि गॅस सिलिंडरने जेवणही तयार करतात.

विशेष म्हणजे या भंगारअड्ड्यांत अनेक प्रकारच्या रसायनांची बॅरल्स तसेच इतर साहित्य असल्यामुळे गॅस सिलिंडरची एखादी ठिणगी पडली तर मोठा अनर्थ होऊ शकतो. रसायनांचे साहित्य त्वरित पेट घेऊन स्फोट होण्याची भीतीही स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT