Water Channel Damage
Water Channel DamageDainik Gomantak

Water Channel Damage: डिचोलीत जलवाहिनीला भगदाड

पाण्याची नासाडीः आयडीसीसह परिसरातील पुरवठ्यावर परिणाम
Published on

डिचोली शहराला पाणी पुरवठा करणारी मोठी जलवाहिनी फुटल्याने आयडीसीसह मुस्लिमवाडा आदी शहरातील काही भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. रात्री उशिरापर्यंत या जलवाहिनीतून पाणी वाहत होते.

ही जलवाहिनी दुरुस्त करेपर्यंत शहरातील काही भागातील पाणी पुरवठा ठप्प राहणार असल्याचे स्पष्ट आहे. पडोसे जलशुद्धीकरण प्रकल्पातून डिचोली शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी आज (गुरुवारी) सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान मुस्लिमवाडा येथे फुटली आहे.

पाण्याची प्रचंड नासाडी

मोठे भगदाड पडल्याने जलवाहिनीतून पाणी बाहेर वाहू लागले. जलवाहिनी फुटताच सायंकाळीच जलवाहिनीतून होणारा पाण्याचा प्रवाह बंद करण्यात आला, तरी रात्री नऊ वाजेपर्यंत घसघसून पाणी वाहत होते.

पाणी बरेच लांब मुस्लिमवाड्यापर्यंत पोचले होते. सायंकाळी ते रात्री उशिरापर्यंत हजारो लिटर पाणी वाहून वाया गेले आहे. जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी कामगारवर्ग घटनास्थळी दाखल झाला असला, तरी वाहणाऱ्या पाण्यामुळे रात्री उशिरापर्यंत दुरुस्ती कामात अडथळा निर्माण झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com