International Purple Fest: राज्यात आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टची तयारी

समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई ः अनेक राज्यांकडून मॉडेलची मागणी
International Purple Fest
International Purple FestDainik Gomantak
Published on
Updated on

International Purple Fest 2023 in Goa: राज्यात दिव्यांगांविषयीचे ‘पर्पल फेस्ट’ यशस्वीरित्या पार पडल्याने केंद्र सरकार आता गोव्यात ‘आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट’ करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.

मंत्रालयाच्या बैठकीनंतर फळदेसाई यांनी ही माहिती दिली. फळदेसाई म्हणाले की, राज्यातील एकूण 1005 लाख लोक कर्कग्रस्त आणि डायलेसिसवर आहेत. त्यांना राज्यपालांनी 2.75 कोटी मंजूर केले होते. त्यापैकी साखळीतील 40 लोकांना निधी देण्यात आला आहे.

याशिवाय समाजकल्याण खात्याचा उपक्रम आहे, ब्रेन रिव्हन म्हणजेच मेंदूला संवेदना पोहोचवून इलेक्ट्रिक हँडच्या मदतीने कार्य करू शकतो, त्या 25 जणांना हाताचे वितरण करण्यात आले.

समाजकल्याण खात्याने व्यावसायिक सामाजिक जबाबदारीतून (सीएसआर) भारत पेट्रोलियमने 50 लाख रुपये निधी दिला. त्यातून हा उपक्रम राबविण्यात आला.

International Purple Fest
Panaji Smart City: ‘स्‍मार्ट सिटी’वरून बाबूश-उत्पलमध्ये जुंपली

मातोश्री संस्थेने सीएसआरमधून मदत केली. आम्ही इतर कॉर्पोरेट संस्थांनाही अशा उपक्रमासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करतो. पर्पल फेस्टसाठी सीएसआरमधून मोठ्या प्रमाणात राज्य सरकारला मदत केली.

पर्पल फेस्टमुळे दिव्यांगांविषयी जी जागृती झाली आहे, त्यातून आता अनेक राज्यांकडून आमच्या पर्पल फेस्टचे मॉडेल मागत आहेत. काही दिवसांपूर्वी आपण दिल्लीला गेलो, तेव्हा आमचा मोठा सन्मान करण्यात आला.

पुढील पर्पल फेस्ट जेव्हा आयोजित कराल तेव्हा केंद्र सरकारही त्यात सहभागी होईल. त्यासाठी 50 टक्के खर्च केंद्र सरकार उचलेले आणि तो फेस्ट आंतरराष्ट्रीय स्तरावर होईल, असे आयोजन करावे, असेही त्यांनी सूचविले असल्याचे फळदेसाई म्हणाले.

International Purple Fest
MLA Disqualification: आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणी 13 एप्रिलपर्यंत तहकूब

‘मंदिरांचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे’

पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या जीर्णोद्धार आणि पुनर्बांधणीबाबत अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने आपला अहवाल सादर केला आहे.

त्याविषयी मुख्यमंत्र्यांपुढे हा अहवाल सादर केल्यानंतर ते त्यावर निर्देश देतील, असे समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com