FC Goa vs Mumbai City ISL Semifinal
FC Goa vs Mumbai City ISL Semifinal FC Mumbai X Handle
गोवा

ISL Semifinal: एफसी गोवाला झटका, आयएसएलच्या उपांत्य लढतीत मुंबई सिटीचा रोमहर्षक विजय

किशोर पेटकर

FC Goa vs Mumbai City ISL Semifinal

सामन्याच्या नव्वदाव्या मिनिटापर्यंत एफसी गोवा संघ २-० असा आघाडी होता, पण मुंबई सिटीने अखेरच्या टप्प्यात बेसावध प्रतिस्पध्र्थ्यांना कोंडीत पकडले आणि धडाधड तीन गोल डागत सामना ३-२ फरकाने जिंकला. या निकालासह मुंबईतील संघाने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल करंडकाच्या अंतिम फेरीच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर बुधवारी रात्री लाल्लियानझुआला छांगटे याने अनुक्रमे ९० व ९०-६व्या मिनिटास असे दोन, तर ९०+१व्या मिनिटास विक्रम प्रताप सिंग नोंदविलेल्या गोलमुळे मुंबई सिटीने स्पर्धेच्या इतिहासातील एका रोमहर्षक विजयाची नोंद केली. छांगटे सामन्याचा मानकरी ठरला. त्याने दोन्ही गोल जयेश राणेच्या असिस्टवर नोंदविले.

दोन गोलच्या आघाडीचा अतिआत्मविश्वास, सुमार बचाव आणि गोलरक्षक धीरज सिंग याच्या चुका एफसी गोवास अखेरच्या शिल्लक मिनिटांत खूपच महागात पडल्या. आता अंतिम फेरी गाठण्यासाठी मुंबई सिटीस घरच्या मैदानावर येत्या २९ एप्रिल रोजी बरोबरीही पुरेशी ठरेल.

एफसी गोवाला उपांत्य फेरीतील दुसऱ्या टप्प्यातील सामना २-० फरकाने जिंकावाच लागेल, तेव्हाच ४-३ सरस गोलफरकाने त्यांना अंतिम फेरी गाठता येईल. मंगळवारी झालेल्या उपांत्य फेरीतील आणखी एका लढतीत ओडिशा एफसीने मोहन बागानला २-१ फरकाने हरविले होते.

उपस्थित सुमारे १७ हजार फुटबॉलप्रेमींसमोर एफसी गोवाने बोरिस सिंग याच्या गोलमुळे १६व्या मिनिटास १-० अशी आघाडी घेतली. नंतर ५६व्या मिनिटास कर्णधार ब्रेंडन फर्नांडिस पुन्हा एकदा अफलातून ड्रिबलिंगचे सुरेख प्रदर्शन घडवत एफसी गोवाची आघाडी २-० अशी भक्कम केली.

त्याचा हा सलग तिसऱ्या लढतीतील गोल ठरला वर्चस्व यजमान संघाने नव्वदाव्या मिनिटापर्यंत टिकवून ठेवले होते, मात्र नंतर त्यांचा बचाव अनपेक्षितपणे ढेपाळला व मुंबई सिटीने अविश्वसनीय असा विजय साकारला.

दृष्टिक्षेपात...

■ मुंबई सिटीविरुद्ध एफसी गोवा सलग ११ सामने विजयाविना, ६ पराभव व ५ बरोबरी

■ आयएसएलमध्ये सलग ५ सामने जिंकल्यानंतर एफसी गोवा पराभूत

■ एकंदरीत एफसी गोवाविरुद्ध २५ लढतीत मुंबई सिटीचे ११ विजय

■ एफसी गोवाची ८ लढतीनंतर (६ विजय, २ बरोबरी) अपराजित मालिका खंडित

■ फातोर्डात एफसी गोवाचे यंदा १३ लढतीत ३ पराभव

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tourist Rush At Morjim Beach: मोरजी समुद्रकिनाऱ्यावर तोबा गर्दी; पर्यटकांसह स्थानिकांचीही वळली पावले

Goa Rain : आला पावसाळा...काळजी घ्या, आरोग्य सांभाळा; डेंग्यू, मलेरियाबाबत जागृती आवश्‍यक

Tiswadi News : तिसवाडीत मध्यरात्री दीड तास बत्तीगुल; ११० केव्ही केबल तुटली

Crime News : नोकरीच्या बहाण्याने विनयभंग; संशयिताला बंगळुरूमध्ये अटक

Panaji News : वेश्या व्यवसायातील २१ कोटी हवालाद्वारे परदेशात; मनी लॉंड्रिंग प्रकरणाचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT