मडगाव: फातोर्ड्याचे पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी आम्हांला जातिवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार फातोर्ड्यातील दोन अनुसूचित जमातीच्या (एसटी) महिलांनी दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक अभिषेक धनिया यांच्याकडे केली आहे. तसेच नायक यांच्याविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई करावी अशी मागणीही केली आहे.
इनासिया कुलासो व दितोजा फालेरो अशी तक्रारदार महिलांची नावे आहेत. गोवा फॉरवर्डने (Goa Forward Party) गुरुवारी काढलेल्या मोर्चावेळी हा प्रकार घडल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. आम्ही फातोर्डा (Fatorda) चौकावरून घरी जात असताना वाटेत गोंधळ झाल्यामुळे आम्ही थांबलो. त्यावेळी कपिल नायक (Kapil Nayak) यांनी जातिवाचक शिवीगाळ करून तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. नायक हे आम्हाला धमकावत असल्याचे पाहून आमदार विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी त्यांना ‘लोकांना पोलिसी खाक्या दाखवू नका’ असे समजावण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
दरम्यान, फातोर्डा मतदारसंघातील कामे बंद ठेवल्याने गोवा फॉरवर्डच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी मोर्चा काढला होता. त्यावेळी सरदेसाई आणि निरीक्षक नायक यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर पोलिसांनी (Police) सरदेसाई आणि इतर 100 जणांवर सरकारी अधिकाऱ्यांना कायदेशीर कारवाई करण्यापासून रोखले व सार्वजनिक रस्ता अडविला असा ठपका ठेवून गुन्हा नोंद केला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.