Counterfeit US dollars Goa 
गोवा

गोव्यात 'फर्जी' रुक्सुद्दीन सुलतान; लाखो बनावट अमेरिकी डॉलर्स छापल्याप्रकरणी भटकळ पोलिसांकडून अटक

Counterfeit US dollars Goa: गोव्यातून बेकायदेशीरपद्धतीने अमेरिकन डॉलर्सची तस्करी केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

Pramod Yadav

बनावट चलनी नोटा छापणे कायद्याने गुन्हा आहे. गरीबीने पिचलेला हिरो नकली चलनी नोटा छापून कसा श्रीमंत होतो आणि तो पोलिस, प्रशासनाला चकमा कसा देतो याचे चित्रण फर्जी या शाहीद कपूरच्या वेब सिरिजमध्ये करण्यात आले आहे. अशाच प्रकारचा एक बेकायदेशीर उद्योग एका व्यक्तीन चालवला होता. भारतीय नव्हे तर त्यानं चक्क आंतरराष्ट्रीय (अमेरिका) डॉलर्स बनावट पद्धतीने छापून त्याची तस्करी सुरु केली होती.

बनावट अमेरिकी डॉलर्स छापून त्याची तस्करी केल्याप्रकरणी भटकळ पोलिसांनी ६२ वर्षीय रुक्सुद्दीन सुलतान बाशा याला अटक केली आहे. त्याच्याकडून ८ लाख रुपयांचे अमेरिकन डॉलर्स जप्त करण्यात आले आहेत. गोव्यातून बेकायदेशीरपद्धतीने अमेरिकन डॉलर्सची तस्करी केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

संशयित रुक्सुद्दीन सुलतान बाशा कप्पा मुजीबला पैसे (बनावट अमेरिकी डॉलर्स) कुरियर करत होता. कप्पा मुजीब हा सध्या फरार असून, पोलिस त्याचा तपास करत आहेत. पोलिसांनी या रॅकेटचा विविध अँगलने तपास सुरु केला आहे. चौकशीत डॉलर्स सोर्स करणारे व्यापक नेटवर्क उघड झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. याबाबत अधिक तपास सुरु आहे.

कोकेन तस्करीशी संबंधित ईडीकडून फिर्यादी तक्रार

गोव्यातील सर्वात मोठ्या कोकेन जप्ती प्रकरणात ईडीने फिर्यादी तक्रार दाखल करण्यात आली आहे. लाओसमधून ४.३२५ किलो कोकेन तस्करीशी संबंधित दोन परदेशी नागरिकांसह ७ आरोपींच्या नावाचा यात समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT