हरीण, स्लॉथ अस्वल! बोंडला अभयारण्यात 12 वर्षानंतर छत्तीसगड आणि महाराष्ट्रातून येणार नवे प्राणी

Bondla Wildlife Sanctuary news: पुण्यातील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातून हरीण आणले जाणार आहे. तर, बिलासपूर येथून स्लॉथ अस्वलांची जोडी आणली जाणार आहे.
Bondla Wildlife Sanctuary to Get New Animals After 12 Years
Deer
Published on
Updated on

पणजी: बोंडला वन्यजीव अभयारण्यात असलेल्या प्राणी संग्रहालय १२ वर्षानंतर नव्या प्राण्यांचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहे. या प्राणी संग्रहालयात ओरडणारे हरीण आणि स्लॉथ अस्वल दाखल होणार आहे. छत्तीसगडमधील बिलासपूर आणि महाराष्ट्र – पुणे येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालय येथून प्राण्यांची देवाणघेवाण होणार आहे.

प्राणी संग्रहालयात नवीन प्राण्यांचा जन्म होत असतो, दरम्यान गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच देवाणघेवाण कार्यक्रमाद्वारे प्राणी गोव्यात आणले जाणार आहेत. जानेवारी २०१३ मध्ये म्हैसूर प्राणी संग्रहालयातून दोन पाणघोडे (देविदास आणि सौंदरिया) हे बोंडलामध्ये दाखल झाले होते.

Bondla Wildlife Sanctuary to Get New Animals After 12 Years
Sindhudurg mystery case: रक्ताने माखलेली कार, कुजलेला मृतदेह; सिंधुदुर्गातील 'त्या' दोन गूढ घटनांमध्ये कनेक्शन काय?

पुण्यातील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातून हरीण आणले जाणार आहे. तर, बिलासपूर येथून स्लॉथ अस्वलांची जोडी आणली जाणार आहे. यासंबंधित आवश्यक प्रक्रिया पार पडली असून, या आर्थिक वर्षात प्राणी बोंडलामध्ये दाखल होतील. स्लॉश अस्वल प्रामुख्याने आकर्षण ठरणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

याबदल्यात पुणे प्राणी संग्रहालयाकडून रानगवा देण्याची मागणी केली आहे. तर, बिलासपूरकडून जंगली मांजर किंवा सोनेरी रंगाचा कोल्हा याची मागणी केली जाऊ शकते. दरम्यान, बिलासपूरला कोणता प्राणी द्यायचा याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. गोव्यात सध्या पाच जंगली मांजरं आणि जवळपास डझनभर रानगवे आहेत.

Bondla Wildlife Sanctuary to Get New Animals After 12 Years
दारूतून पाजले गुंगीचे औषध; गोव्यात सलून चालवणाऱ्या महाराष्ट्रातील 26 वर्षीय तरुणीचा मृत्यू

प्राणी देवाणघेवाण संबंधित प्रस्ताव सध्या गोवा सरकारकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे. तर, महाराष्ट्र आणि छत्तीसगड सरकारने याबाबत मंजुरी दिली आहे. गोवा सरकारकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर केंद्राकडे प्रस्ताव पाठवला जाईल.

७.९ चौरस किमी क्षेत्रफळ असलेले, बोंडला वन्यजीव अभयारण्य हे गोव्यातील सर्वात लहान संरक्षित क्षेत्रांपैकी एक आहे. येथे बिबट्या, जंगली मांजर, कोल्हा, हरीण, चार शिंगे असलेले काळवीट, पाम सिव्हेट, इमू, निळा आणि सोनेरी मकाव आणि मोर यासारखे प्राणी आहेत. वाघासारखे मांसाहारी प्राणी बोंडला येथे घेऊन येण्याचा अद्याप कोणताही प्रस्ताव नसल्याने प्रशासनाने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com