Vasco News Dainik Gomantak
गोवा

Vasco News: रेल्वेस्थानकासमोर विक्रेत्यांचे अतिक्रमण, नगरपालिकेची बघ्याची भूमिका

वास्कोवासीयांत संताप: मुरगाव नगरपालिकेचे कारवाईकडे अक्षम्‍य दुर्लक्ष

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को रेल्वे स्थानकासमोर पुन्हा रस्त्यावर विविध खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अतिक्रमण करून खुर्च्या मांडल्याने तेथील परिसर सांडपाण्याने गलिच्छ झाला आहे. मात्र, मुरगाव पालिका कारवाई करण्याकडे डोळेझाक करीत असल्याने वास्कोवासीयांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

यापूर्वी कारवाई करताना नगराध्यक्ष तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आम्ही यापुढे असे प्रकार खपवून घेणार नाही, असे जे सांगितले होते. त्याचा त्यांना विसर पडला का, असा सवाल वास्को-वासीयांकडून विचारला जात आहे.

मध्यंतरी मुरगाव पालिकेकडून काहीजणांवर कारवाई करण्यात आली. तसेच अन्न व औषध प्रशासनाने तेथील जागेची व उघड्यावर ठेवण्यात येणाऱ्या अन्नपदार्थाची तपासणी केली होती. त्यावेळी काहीजणांना इशारा देण्यात आला होता.

त्यानंतर दुसऱ्यांदा तपासणी करताना काहीजणाविरोधात कारवाई करण्यात आली. काहीजणांच्या वस्तू, खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले. एक गाडाही जप्त करण्यात आला.

त्यावेळी मुरगावचे नगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्ज यांनी यापुढे असे प्रकार खपवून घेणार नसल्याचा विक्रेत्यांना इशारा दिला होता. परंतु, त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी गेले.

येथील अतिक्रमण व गलिच्छपणा प्रकरणी मुरगाव पालिकेला व इतरांना कल्पना देण्यात आली आहे. परंतु, त्यांच्याकडून कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

यामागे कोणते अर्थकारण आहे, हे समजण्यास मार्ग नाही. सदर हातगाडे वास्को रेल्वेस्थानकासमोर असल्याने गोव्याबाहेरील पर्यटकांच्या प्रथमदर्शनी नजरेस पडतात. त्यामुळे वास्को शहराच्या प्रतिमेला तडा जात आहे.

पालिकेच्या आशीर्वादानेच गाडे स्थिरावले

वास्को रेल्वे स्थानकासमोरच्या जागेवर ऑम्लेटपाव, चहा, विविध शीतपेये, फास्ट फूड व इतर पदार्थ विकणाऱ्यांचे गाडे आहेत. या गाडेधारकांचे हातगाडे उभे करण्यासाठी मुरगाव पालिकेने फलाट बांधून दिला होता.

मात्र, या हातगाडेवाल्यांनी तेथील पदपथ व रस्त्यावर अतिक्रमण करून तेथे खुर्च्या मांडून एक प्रकारे हॉटलच सुरू केले आहे. पूर्वी सदर हातगाडे सायंकाळी घरांकडून आणून पुन्हा घरी नेले जात होते. परंतु, आता मुरगाव पालिकेच्या आशीर्वादाने ते हातगाडे तेथेच स्थिरावले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT