Ponda Municipal Election 2023: आता फोंड्यात गाठीभेटींवर भर

भाजप नेत्यांचे जातीने लक्ष : काही प्रभागांत चुरशीच्या लढतीची शक्यता
Ponda Municipal Election
Ponda Municipal Election Dainik Gomantak
Published on
Updated on

Ponda Municipal Election 2023: बुधवारी सायंकाळी 5 वाजता जाहीर प्रचार संपल्यामुळे उमेदवारांनी आता वैयक्तिक गाठीभेटींवर भर देण्यास सुरवात केली आहे. यावेळी काही प्रभागांत कोपरा बैठकाही घेण्यात आल्या.

यात भाजपचे नेते जास्त प्रमाणात दिसले. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी प्रभाग 10 व 14 मध्ये कोपरा बैठका घेतल्या.

राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर तसेच फोंड्याचे आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक यांनीही विविध प्रभागांत बैठका घेऊन भाजप पॅनेलच्या उमेदवारांचा प्रचार केला.

काँग्रेसचे कुणी मोठे नेते प्रचाराला न आल्यामुळे प्रचाराची सर्व आघाडी फोंड्यातील काँग्रेस नेते राजेश वेरेकर यांना सांभाळावी लागली.

त्यांनी जास्त भिस्त दिली आहे ती प्रभाग ११ व १२वर. या प्रभागात अनुक्रमे माजी नगराध्यक्ष शैलेंद्र शिक्रे यांची कन्या शुभलक्ष्मी व पत्रकार विराज सप्रे हे निवडणूक लढवीत आहेत.

Ponda Municipal Election
Fatorda Swimming Pool Accident: आई-वडील जवळ नसताना तो स्विमिंग पूलमध्ये उतरला, कर्नाटकच्या पाच वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

रायझिंग फोंडा या पॅनेलची सर्व मदार राहिली ती डॉ. केतन भाटीकर यांच्यावर. ते बऱ्याच प्रभागांत घर टू घर प्रचार करताना दिसत होते. त्यांनी १२ उमेदवार रिंगणात उतरवले असून या उमेदवारांचा प्रचार करणारी

फिरती गाडी कालपर्यंत पालिका कक्षेत फिरताना दिसत होती. मात्र, यावेळी एकाही पॅनेलने जाहीर सभा घेतलेली दिसली नाही.

मगोचे सर्वेसर्वा तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर हे प्रचारापासून अलिप्तच राहिले. त्यामुळे मागच्या वेळेच्या मानाने यावेळचा प्रचार बराच फिका वाटला.

Ponda Municipal Election
Ponda-Sanquelim Municipal Election 2023: फोंडा, साखळी पालिकांवर भाजपचाच झेंडा- तानावडे

या लढतीवर सर्वांच्या नजरा

प्रभाग 1 मध्ये आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक यांचे दुसरे पुत्र रॉय हे रिंगणात असून त्यांना रायझिंग फोंडाचे नंदकुमार डांगी यांच्याशी सामना करावा लागत आहे. लवलेश कवळेकर व ज्योती कुलकर्णी याही रिंगणात असल्या तरी खरी लढत होणार आहे ती रॉय व नंदकुमार डांगी यांच्यामध्ये.

अर्चना डांगी या प्रभागाच्या विद्यमान नगरसेविका असून नंदकुमार हे त्यांचे नातेवाईक आहेत. फोंडावासीयांच्या नजरा या लढतीवर लागून राहिल्या आहेत.

प्रभाग 3 मध्ये कोण ठरणार भारी?

प्रभाग 3 मध्ये भाजप पॅनेलच्या ज्योती नाईक या रिंगणात असून त्यांना रायझिंग फोंडाच्या शेरोल डिसोझा यांना तोंड द्यावे लागत आहे. ही लढतही उत्कंठावर्धक ठरत असून कोणाचा पगडा भारी ठरतो, यावर लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.

पण सर्वात महत्त्वाची लढत ठरत आहे ती प्रभाग ५मधील. या प्रभागात विद्यमान नगराध्यक्ष रितेश नाईक हे निवडणूक लढवीत असून त्यांना रायझिंग फोंडाचे सुशांत कवळेकर व अपक्ष श्रवण नाईक हे आव्हान देत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com