Elvis Gomes Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: ..काँग्रेसमध्ये भाजपला मदत करणारा ‘रोग’! एल्‍विस गोम्‍स यांचे टीकास्त्र; नेत्‍यांना ‘डिटॉक्‍स’ करण्‍याची गरज असल्याचा दावा

Elvis Gomes: या रोगातून जर काँग्रेसला मुक्‍त व्‍हायचे असेल, तर पक्षातील नेत्‍यांना ‘डिटॉक्‍स’ करण्‍याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते एल्‍विस गोम्‍स यांनी व्‍यक्‍त केली.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात केले, तर त्‍याचे परिणाम कसे असतात? याचा अनुभव काँग्रेस पक्षाला यापूर्वी आला होता. त्‍याचीच आता पुनरावृत्ती होत आहे. काही जणांना काहीही झाले तरी भाजपालाच मदत करायचा रोग जडला आहे. या रोगातून जर काँग्रेसला मुक्‍त व्‍हायचे असेल, तर पक्षातील नेत्‍यांना ‘डिटॉक्‍स’ करण्‍याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते एल्‍विस गोम्‍स यांनी व्‍यक्‍त केली.

ते पुढे म्हणाले, दक्षिण गोवा जिल्‍हा पंचायतीच्‍या अध्‍यक्ष आणि उपाध्‍यक्ष निवडीवेळी विरोधकापूर्वी एकाने क्राँस वोटिंग केले याबद्दल गोम्‍स यांनी प्रतिक्रिया व्‍यक्‍त करताना, असे होणार हे सर्वांनाच माहीत होते. आणि तशी भीतीही व्‍यक्‍त केली होती. मात्र ते ऐकले गेले नाही. यापूर्वी

मायकल लोबो यांना काँग्रेस पक्षात घेऊन त्‍यांना उमेदवारी देऊन निवडून आल्‍यानंतर ते एक काँग्रेसचा गट घेऊन भाजपात पुन्‍हा कसे गेले हे सर्वांनाच माहीत आहे. आमचे नेते पूर्वीच्‍या चुकीतून धडे घेत नाहीत, असे म्‍हणावे लागेल.

गोम्‍स यांनी जिल्‍हा पंचायत निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्‍या विरोधात काम केले, असा ठपका ठेवून त्‍यांना जी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, त्‍यावर त्‍यांची प्रतिक्रिया विचारली असता, त्‍या नोटीसीला योग्‍य ते उत्तर देऊ. पक्षातील काही नेत्‍यांनी हा विषय जसा प्रसार माध्‍यमांकडे मांडला तसा तो मला मांडायचा नाही. मी माझे उत्तर पक्षाला सादर करेन असे ते म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclubs: 25 जणांच्या मृत्यूचे सावट, तरीही सील केलेले नाईट क्लब पुन्हा सुरू; दोन आठवड्यांत परवाने कसे मिळाले?

Bicholim River Front: ‘रिव्हर फ्रंट’चे सौंदर्यीकरण हरवतेय! डिचोलीत अस्तित्वासाठी संघर्ष; देखभालीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष

Siolim Jagor Jatra: "सगळे देवू एकूच..."! मध्यरात्री सगळे ‘दांडो’ वाड्यावरील जागरेश्वराच्या दिशेने वळतात; शिवोलीचा जागोर

Goa Live News: सांडपाण्यामुळे खारफुटीचा ऱ्हास; कचरा प्रक्रिया प्रकल्पावर गंभीर आरोप

अग्रलेख: ‘गोंय गोंयकारांचे उरूंक ना’ हेसुद्धा दिल्लीवाल्या हिंदीत सांगावे लागेल! सरत्या वर्षाकडे मागे वळून पाहताना..

SCROLL FOR NEXT