

मडगाव: दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना अपेक्षित १५ ऐवजी एक मत अधिक म्हणजेच १६ मते मिळाल्याने चर्चेला उधाण आले आहे. हे अतिरिक्त मत नेमके कुणाचे, या प्रश्नावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
काँग्रेस गोटातून हे विरोधी मतदान आम आदमी पक्षाचे कोलवा येथील सदस्य आंतोनियो फर्नांडिस यांनी केल्याचा दावा केला जात आहे. तर, भाजप गोटातून हे मतदान नुकतेच भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले आणि गिरदोली मतदारसंघातून निवडून आलेले संजय वेळीप यांनी केल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे भाजपविरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र राहतील, या समजाला तडा गेला आहे.
दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीत भाजपचे ११ सदस्य निवडून आले असून, मगोचे २ आणि २ अपक्षांनी पाठिंबा दिल्याने सत्ताधारी गटाचे संख्याबळ १५ झाले होते. विरोधी गटात काँग्रेसचे ८, गोवा फॉरवर्डचा १ आणि आम आदमी पक्षाचा १ सदस्य असे एकूण १० सदस्य होते.
त्यामुळे भाजपला १५ व विरोधकांना १० मते मिळतील असा अंदाज होता. प्रत्यक्षात मात्र भाजपला १६ व विरोधकांना ९ मते मिळाली. दरम्यान, या एका मतामुळे राजकीय वातावरण तापले असून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
काँग्रेसचे वेळीप यांच्यावरही संशय
मतदानानंतर काँग्रेसचे गिरदोलीचे सदस्य संजय वेळीप जिल्हा पंचायत कार्यालयातून तत्काळ निघून गेल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वेळीप यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, त्यांच्या वाड्यावरील एका व्यक्तीचे निधन झाल्याने अंतिम संस्कारासाठी त्यांना तातडीने जावे लागले. भाजपचे नेते जाणूनबुजून आपले नाव वापरून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला
अपेक्षेप्रमाणे रेश्मा बांदोडकर, सिद्धार्थ गावस देसाई अध्यक्ष
अपेक्षेप्रमाणे उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदी भाजपच्या रेश्मा बांदोडकर तर उपाध्यक्षपदी नामदेव व्यारी यांची तर दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदी भाजपचेच सिद्धार्थ गावस देसाई तर उपाध्यक्षपदी अंजली वेळीप यांची निवड झाली.
"आप'चे नाव बदनाम 66 करण्या साठी है काँग्रेसचे षडयंत्र आहे. आम्ही कधीही भाजपसोबत नव्हतो. 'आप'च्या सदस्याने भाजपच्या उमेदवाराला मतदान केले हा काँग्रेसचा आरोप बिनबुडाचा आहे", असे आपचे आमदार कुझ सिल्वा म्हणाले.
"आम्हाला एक मत ज्यादा मिळाले याचा आनंद अतच्या . ज्याने कोणी हे मत दिले तो सरकारबरोबर आहे हे त्याने दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे त्याने विकासाला मत दिले आहे", असे दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धार्थ गावस देसाई म्हणाले.
'आप' चे कोलवाचे सदस्य आंतोनियो फर्नांडिस यांनीच क्रॉस व्होटिंग केले आहे. कारण हा पक्ष या निवडणुकीत आमच्याबरोबर कधीच नव्हता भाजपची 'बी टीम' कोणती हे आता स्पष्ट झाल्याचे दक्षिण गोवा काँग्रेस समितीचे अध्यक्ष सावियो डिसिल्वा म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.