Electricity Problem In Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील वीज दरवाढ सहा महिन्यापूर्वीचीच!

सुदिन ढवळीकरांचं स्पष्टीकरण; केंद्रीय वीज नियंत्रण मंडळाच्या शिफारशींनुसारच नवे दर

दैनिक गोमन्तक

मडगाव : गोवा राज्य वीज उत्पादनात स्वावलंबी नसल्याने आम्हाला विजेसाठी दुसऱ्या राज्यांवर अवलंबून राहावे लागत असल्यामुळे विजेचे दरही केंद्रीय वीज नियंत्रण मंडळाच्या शिफारसीनुसारच ठरवावे लागतात, असे सांगून सध्या जी दरवाढ लागू झाली आहे, ती मंडळाने सहा महिन्यांपूर्वीच मंडळाने सुचविली होती, असा खुलासा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केला आहे. मडगावातील हरिमंदिरात एका धार्मिक कार्यक्रमासाठी आले असता प्रसारमाध्यमांनी त्यांना नव्या दरवाढीबद्दल विचारले असता त्यांनी ही माहिती दिली. गोव्यातील दरवाढ युनिटमागे 10 ते 40 पैसे अशी असल्याचेही त्यांनी सांगितले.

गोव्यात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी राज्यातील ट्रान्सफॉर्मर आणि कंडक्टर बदलण्याची गरज आहे. राज्यातील काही ट्रान्सफॉर्मर 25 वर्षे जुने आहेत. ते प्राधान्यक्रमाने बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या कामाला सुरुवात झाली आहे,असेही ते म्हणाले. नीलेश काब्राल वीज मंत्री असताना त्यांनी चांगले काम केले. मात्र, त्यापूर्वीच्या मंत्र्यांची कामगिरी मात्र समाधानकारक नव्हती, असे त्यांनी सांगितले.

विजेची चोरी होऊ नये, यासाठी बेकायदेशीररीत्या वीज वापरणाऱ्यांवर कडक नजर ठेवून असे प्रकार बंद करण्यावर भर देत आहोत. त्याशिवाय सुमारे साडे चार हजार कायदेशीर कनेक्शन देण्याचे काम बाकी होते. त्यापैकी साडे तीन हजार कनेक्शन दिली आहेत आणि राहिलेली कनेक्शन्स लवकरच दिली जातील, असे त्यांनी सांगितले.

गोव्यात पुष्कळ ठिकाणी जुने वीज कंडक्टर व ट्रान्सफॉर्मर आहेत ते बदलण्याची प्रक्रिया लवकरच सुरु केली जाईल, असे वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. काही कंडक्टर 15 वर्ष जुने तर ट्रान्सफॉर्मर 25 सुद्धा वर्षे जुने आहेत. वीज पुरवठा अखंडित चालू ठेवण्यासाठी व कुठेही अपघाती स्थिती उत्पन्न होऊ नये म्हणून कंडक्टर व ट्रान्सफॉर्मर बदलणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

AI+ New Gadgets: भन्नाट फीचर्स अन् जबरदस्त परफॉर्मन्स! AI+ ने बाजारात आणली 3 नवी शक्तिशाली गॅजेट्स; काय आहेत वैशिष्ट्ये? किंमत किती?

खरी कुजबुज: काँग्रेसची वजाबाकी

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT