सहा महिन्यांत मंत्र्यांसह सरकारचे रिपोर्ट कार्ड बनणार

चुका केल्या असतील तर सोडणार नाही; सी. टी. रवी यांचं टीसीपी कारवाईवरही भाष्य
C. T. Ravi
C. T. RaviDainik Gomantak 
Published on
Updated on

पणजी : गोव्याच्या जनतेला चांगले प्रशासन देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे 6 महिन्यानंतर प्रत्येक मंत्र्यांचे आणि सरकारचे रिपोर्ट कार्ड तयार होईल. तसेच पदावर असताना यापूर्वी कुणी चुका केल्या असतील तर त्यांची गय केली जाणार नाही, असे भाजप प्रभारी सी.टी. रवी यांनी काल बुधवारी स्पष्ट केले. दिवसभराच्या बैठका सत्रानंतर ते माध्यमांशी बोलत होते. सी टी रवींच्या वक्तव्यामुळे मंत्री आमदार सतर्क झाले आहेत.

C. T. Ravi
'काब द राम किल्ल्याचा विकास करताना विश्वासात घ्या'

‘विधानसभा निवडणुका जिंकणे भाजपच्या दृष्टीने कठीण होते. पण लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकारवर दाखवलेल्या विश्‍वासाला पात्र ठरवण्यासाठी ‘स्व’ हितापेक्षा लोककल्याण महत्त्वाचे आहे आणि मंत्र्यांनी त्यानुसारच काम करावे. यापूर्वी पदावर असताना कुणी चुका केल्या असतील तर गय केली जाणार नाही’ असे माजी मंत्री मायकल लोबो यांचे नाव न घेता त्यांच्यावरील नगर नियोजन खात्याच्या कारवाईबद्दल बोलताना रवी यांनी भाष्य केले.

C. T. Ravi
शिरगावात लईराईच्या जत्रेला उत्साहात प्रारंभ

दरम्यान, काल सकाळी त्यांनी अल्तिनो सर्किट हाऊसवर मंत्री, आमदार यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर भाजपच्या कार्यालयात पक्षाच्या सुकाणू समितीची बैठक घेतली. या तिन्ही बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. काही लोक जातीय आणि धार्मिक सलोखा बिघडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात तोच त्यांचा उद्देश असतो. राज्यात गोव्यात कायदा आणि सुव्यवस्था अत्यंत चोख असून ते टिकवण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न असतील. गोवा मजबूत करण्याबरोबर राष्ट्र मजबूत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु, असंही भाजप प्रभारी सी. टी. रवी यांनी स्पष्ट केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com