Wildlife In Goa Dainik Gomantak
गोवा

Wildlife In Goa: जंगल, वन्यजीव संपदा वाचवण्यासाठी प्रयत्न हवेत- पर्यावरण अभ्यासक

वन्यजीव मंडळाची 4 वर्षांत एकही बैठक नाही- राजेंद्र केरकर : जबाबदारीकडे वेधले लक्ष;

गोमन्तक डिजिटल टीम

Wildlife In Goa: यापूर्वीच्या गोवा राज्य वन्यजीव मंडळाची गेल्या 3 ते 4 वर्षांत एकही बैठक झालेली नाही. त्यामुळे नव्याने स्थापन केलेल्या मंडळाच्या सर्व सदस्यांवर वन्यजीव आणि त्यांचा अधिवास सुरक्षित राखण्याची जबाबदारी आहे. त्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, असे मत पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी व्यक्त केले.

राज्यातील जंगलात मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा अधिवास आहे. त्यांना संरक्षण देणे गरजेचे आहे. या दृष्टीकोनातून नवनिर्वाचित मंडळाच्या सदस्यांनी काम करण्याची अत्यंत आवश्‍यकता आहे, असेही केरकर म्हणाले.

पाच चौ.कि.मी. जंगल खाक : हल्लीच सुमारे 5 चौरस किलोमीटर जंगल मानवी हस्तक्षेपामुळे खाक झाले. यात अनेक वन्यजीव मृत्युमुखी पडले असावेत. तसेच अनेक वन्यजीव स्थलांतरित झाले असावेत.

त्यामुळे वन्यजीवांच्या अस्तित्वासाठी मंडळाने सखोल विचार करून ते प्रत्यक्षात आणावेत. सद्यस्थितीत वन्यजीव असुरक्षित आहेत, असे राजेंद्र केरकर यावेळी म्हणाले.

12 वर्षांत पाच वाघांचा बळी

राज्यात 2009 ते 2021 या कालखंडात पाच वाघांचा मृत्यू झाला, ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे वन्यजीव सुरक्षिततेसाठी मंडळाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. तसेच त्यासाठी ठोस प्रयत्न व्हायला हवेत.

येथील जंगल क्षेत्रात वन्यजीव अधिवास तसेच त्यांना संरक्षण कशाप्रकारे देता येईल, यावर मंडळाने वेळोवेळी बैठका घेऊन चर्चा करायला हवी, असे केरकर यांनी सुचविले.

वन्यजीव मंडळ अध्यक्षपदी सीएम

राज्य सरकारने 31 सदस्यीय गोवा राज्य वन्यजीव मंडळाची पुनर्रचना केली आहे. या मंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत असून, उपाध्यक्ष वनमंत्री विश्‍वजीत राणे आहेत.

सरकारने पुनर्रचना केलेल्या या मंडळामध्ये सावर्डेचे आमदार गणेश गावकर, पर्येच्या आमदार दिव्या राणे, कुठ्ठाळ्ळीचे आमदार आंतोनिओ वाझ यांच्यासह काही एनजीओ, पोलिसप्रमुख, भिरोंडाचे सरपंच व इतरांची सदस्य म्हणून नेमणूक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fish Export:"सद्या श्रावण सुरु आसा, हांवूंय नुस्ते खायना" मासे निर्यातीवरून LOP आलेमाव आणि CM सावंतमध्ये रंगला कोकणी संवाद; Watch Video

Goa Assembly Live: सनबर्नला गोव्यात परत आणण्यासाठी प्रयत्न करणार; आमदार मायकल लोबो यांचे विधानसभेत आश्वासन

Viral Video: 'मी झाडांची महाराणी...!' झाडाच्या फांदीवर बसलेल्या महिलेची 'अजब' रील व्हायरल; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट

ICC Rankings: भारतीय गोलंदाजांचा बोलबाला! आयसीसीच्या ताज्या रँकिंगमध्ये सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाची मोठी झेप

Sunburn Festival 2025: 17 वर्षांनी गोव्याला रामराम, यंदाचा 'सनबर्न' होणार मुंबईत; तारखा जाहीर!

SCROLL FOR NEXT