Goa Traffic Rule: राज्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्ग तसेच काही शहरी भागातील रस्त्यांवरील 21 ठिकाणी वाहनांच्या वेगमर्यादेविषयी गुरुवारी अधिसूचना जारी करण्यात आली.
त्यामुळे यापुढे चालकांना वाहनाच्या वेगावर लक्ष द्यावेच लागणार आहे. अन्यथा मोबाईलवर चलन मिळू शकते. पणजीतील बहुतेक सर्व रस्त्यांवरील वेगमर्यादा ४० किलोमीटर प्रतितास ठेवली आहे.
अशी असेल वेगमर्यादा (प्रतितास)
बाणस्तारी पूल, शिरदोण पूल तसेच नवा, जुना मांडवी पूल - ४० किमी
दिवजा सर्कल ते जुने गोवे दर्गा, हात कातरो खांब ते बाणस्तारी पूल - ४० किमी
मेरशी सर्कल ते हात कातरो खांब (व्हाया कदंब पठार) - ७० किमी
कदंब सर्कल ते शिरदोण पूल ते झुआरी पूल - (दुचाकी- ६०), (चारचाकी- ७०), प्रवासी वाहने ६० किमी.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.