Enforcement Directorate raid Goa Dainik Gomantak
गोवा

काँग्रेस आमदाराच्या गोव्यातील कॅसिनोंवर ईडीचे छापे; पहाटे पाचपासून झाडाझडती सुरु

ED Raid: पणजीतील पाटो. कांदोळी, मांडवीतील बोट यासह एकूण चार ठिकाणी छापासत्र अद्याप सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.

Pramod Yadav

पणजी: ऑनलाईन गेमिंग आणि बेटींगसंबधित मनी लॉन्ड्रिग प्रकरणी कर्नाटकातील काँग्रेस आमदार अडचणीत सापडला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने आमदार के. सी वीरेंद्र यांच्या कर्नाटकातील मालमत्तांवर छापेमारी केल्यानंतर गोव्यातील कॅसिनोंवर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास छापा टाकला, अजून ईडीची याठिकाणी झाडाझडती सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काँग्रेस आमदाराच्या गोव्यातील कॅसिनो कंपनीच्या आस्थापनांवर ईडीने पहाटे पाचच्या सुमारास छापेमारी केली. पणजीतील पाटो. कांदोळी, मांडवीतील बोट यासह एकूण चार ठिकाणी छापासत्र अद्याप सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. या ठिकाणी अंदर बाहर सुरु असल्याचे सांगितले जात आहे.

अंमलबजावणी संचालनालयाकडून ऑनलाईन गेमिंग आणि बेटींगसंबधित मनी लॉन्ड्रिग प्रकरणी आमदार के. सी वीरेंद्र यांच्या कर्नाटकातील मालमत्तांवर छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे.

के. सी. वीरेंद्र कर्नाटकातील चित्रदुर्ग मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेले आमदार आहेत. गोव्यात त्यांच्या कंपनीच्या कॅसिनोवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली. ही कारवाई अद्याप सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT