
पणजी: "गोव्यात कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली असून, गुन्हेगारांना पोलिसांनी भीती राहिलेली नाही. पोलिस मॅनेज होऊ शकतात याची खात्री पोलिसांना झालीय. राज्यात राजकीय संरक्षणात अंडरवर्ल्डची एन्ट्री झाली आहे," अशी टीका गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली.
“गोव्यात कायदा आणि सुव्यवस्था अशी काही गोष्टच अस्तित्वात नाही. पोलिसांना मॅनेज केले जाऊ शकतं हे गुन्हेगारांना समजले आहे. तसेच, पोलिस खात्यात राजकीय हस्तक्षेप एवढा वाढलाय की चांगल्या पोलिस अधिकाऱ्याला पोस्टींग मिळतच नाहीये. पोलिस अधिकाऱ्याला विशिला नसेल किंवा तो सत्ताधारी सरकारचा चमचा नसेल तर त्याला चांगली पोस्टींग मिळतच नाही,” असा आरोप विजय सरदेसाईंनी केला.
“अशामुळे चांगले पोलिस अधिकारी आहेत ते जीआरपीमध्ये पडून राहतात आणि सरकारचे चमचे विविध पदांवर बसतात. मडकईत गोळीबार झाला, यापूर्वी मुंगुल येथे धक्कादायक घटना घडली. यामुळे गोव्यात आता राजकीय संरक्षणात अंडरवर्ल्डचा प्रवेश झाला आहे,” अशी टीका सरदेसाईंनी केली. पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत बोलताना त्यांनी कुडचडे येथील घटनेचा उल्लेख विधानसभेत केल्याचे सांगितले. याप्रकरणी कोणताही गुन्हा नोंद झाला नसल्याचे त्यांनी नमूद केले.
विजय सरदेसाईंनी यांनी पोलिस महासंचालकांना देखील अक्शनमोडमध्ये येण्याचे अहवान केले. त्यांना ते वरिष्ठ अधिकारी आहेत हे दाखवून द्यावे असेही सरदेसाई म्हणाले. सरकारमध्ये हे कोणाला जमत नसेल तर गृहखाते रवी नाईक यांच्याकडे द्यावे. नाईकांनी साईंलेंन्सरसाठी अनेकांना जेलमध्ये पाठवले होते, असे सरदेसाई म्हणाले.
रवी नाईक यासाठी सक्षम असल्याचे त्यांनी यापूर्वी देखील दाखवून दिले आहे. जागृत गोंयकार सरकारला आरसा दाखवतील आणि एक दिवस याचे विसर्जन करतील, असे सरदेसाई म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.