Monsoon Update Dainik Gomantak
गोवा

Monsoon Update: पावसाअभावी शेतीची कामे खोळंबली; शेतकरी हवालदिल

डिचोलीत प्रतीक्षा पावसाची : शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे

गोमन्तक डिजिटल टीम

Monsoon Update जून महिना संपत आला तरी अद्याप मोसमी पाऊस सक्रिय न झाल्‍याने बळीराजा चिंतेत पडला आहे. पावसाअभावी सर्वत्र खरीप शेतीची सुरूवातीचीच कामे खोळंबून पडली आहेत.

शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागून राहिली असून, ते डोळ्यात तेल घालून आकाशाकडे पाहत आहेत. कधी एकदाचा दमदार पाऊस सुरू होतोय आणि शेतीत उतरायला मिळते याची शेतकऱ्यांना काळजी लागून राहिली आहे.

डिचोली व परिसरात शेतीची कामे सुरू झाली असली तरी पाऊस नसल्‍याने या कामांना अजून म्‍हणावा तसा जोर आलेला नाही. जून महिना संपेपर्यंत दमदार पर्जन्यवृष्टी झाली नाही तर यंदा शेती व्यवसाय धोक्यात येण्याचे संकेत मिळत आहेत.

तशी भीतीही शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. डिचोली हा कृषीप्रधान तालुका. तालुक्यातील साळ, मेणकुरे, धुमासे, लाटंबार्से, बोर्डे, मये, पिळगावसह बहुतांश भागात खरीप शेती लागवड केली जाते.

मान्सून सक्रिय झाला की दरवर्षी जून महिन्याच्या सुरूवातीलाच गावोगावी शेतीच्‍या कामांची लगबग दिसून येत असे. नांगरणी आदी मशागत करून शेतकरी तरव्याची पेरणी करायचे.

जून महिन्याच्या सरतेशेवटी काही भागात तरवा लागवडीची कामेही सुरू व्हायची. यंदा मात्र अजून दमदार पावसाचे आगमन झाले नसल्याने तरव्याची पेरणी सोडाच, नांगरणी आदी शेतीची सुरूवातीची कामे अडकून पडली आहेत.

काहीनी शेतजमीन नांगरली आहे, तर पिळगावसह बहुतांश भागात अद्याप बळीराजा शेतीत उतरलेला नाही. अद्याप दमदार पावसाची चिन्हे दिसत नसल्याने शेतकरी पूर्णतः हवालदिल आणि अस्वस्थ बनला आहे.

1 हजार 368 हेक्टर शेतजमीन लागवडीखाली : नीलिमा गावस

विभागीय कृषी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात डिचोलीत यंदा 1हजार 368 हेक्टर शेतजमीन खरीप लागवडीखाली आणण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे.

त्यासाठी कृषी खाते सज्जही झाले आहे. काही भागात ट्रॅक्टरद्वारे नांगरणी करण्यात आलीय.

शेतकऱ्यांना भात-बियाणे वितरित करण्यात आले आहेत. मात्र अद्याप अनुकूल पाऊस पडला नसल्याने शेतीची कामे अडकून पडली आहेत.

जून महिन्याच्या अखेरपर्यंत पूरक प्रमाणात पाऊस पडून शेतीकामांना गती मिळण्याची आशा आहे, असे डिचोली विभागीय कृषी अधिकारी नीलिमा गावस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT