Rumdamol Panchayat : रुमडामळ परिसरातील बेकायदा कृत्यांकडे पंचायतीची डोळेझाक

विरोधी गटाचे पंच विनायक वळवईकर यांनी करून आपल्यावर जो खुनी हल्ला झाला त्यामागे हेच कारण असल्याचा घणाघाती आरोप केला.
Rumdamol Panchayat
Rumdamol PanchayatDainik Gomantak

Rumdamol Panchayat : रुमडामळ पंचायतीत पंचायत राज्य कायदा चालत नाही. या पंचायतीत सध्या चालू आहे, ते ‘पीएफआय राज’ असा आरोप विरोधी गटाचे पंच विनायक वळवईकर यांनी करून आपल्यावर जो खुनी हल्ला झाला त्यामागे हेच कारण असल्याचा घणाघाती आरोप केला. सरपंच मुबिना फणीबंद आणि तिचे पती समीउल्ला फणीबंद हे या ‘पीएफआय’ गटाशी संलग्न आहेत.

बेकायदेशीर मदरसा उभा होण्यास हेच कारण आहे. त्यामुळे ही पंचायत बरखास्त करण्याची गरज आहे. अन्यथा या भागातील परिस्थिती सुधारणारच नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली

रुमडामळ दवर्ली पंचायत क्षेत्रात जे बेकायदेशीर व्यवहार चालू आहेत, त्यामुळेच येथे रोज तणाव पसरत आहे. सरपंच मुबिना फणीबंद आणि तिचे पती समीउल्ला फणीबंद यांचा हात त्यात असून त्यांच्याच आशीर्वादाने हे बेकायदेशीर व्यवहार चालू आहेत, असाही आरोप वळवईकर यांनी केला.

Rumdamol Panchayat
Goa Employment: फाईव्हस्टार हॉटेल, कॉलेज, अन्न प्रक्रिया उद्योग अशा 3 प्रकल्पांना मंजुरी; 1338 जणांना मिळणार रोजगार

रुमडामळ दवर्ली पंचायत पंचायत राज कायदा पाळत नाही, ते ‘पीएफआय’ कायद्याचे पालन करतात. सरकारने या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून आवश्यक पावले उचलायला हवीत, अशी मागणी त्यांनी केली. पीएफआय सारख्या प्रवृत्तींना पाठिशी घालणाऱ्यांमुळे रुमडामळ परिसरात अवैध कृत्ये वाढत आहेत,असेही ते म्हणाले.

Rumdamol Panchayat
Goa Petrol-Diesel Price: सलग पाचव्या दिवशी इंधन दर जैसे थे! जाणून घ्या गोव्यातील पेट्रोल-डीझेलचे आजचे दर

बेकायदा कृत्यांकडे पंचायतीची डोळेझाक !

रुमडामळ दवर्ली, हाऊसिंग बोर्ड भागात जे काही वाईट चालले आहे, त्याला कारण हाऊसिंग बोर्डात बेकायदेशीररित्या राहणारे लोक आहेत. त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांवर पंचायत कोणतीही कारवाई करत नाही. सध्याचे सरपंच मुबिना आणि त्यांचे पती समीउल्ला फणीबंद हे त्यांना सहाय्य करत असून माझ्यावर झालेल्या हल्ल्याशी तेच संबंधित असावेत, अशी मला शंका येते, असे विनायक वळवईकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com