Drishti Lifesavers Rescue Drishti Lifesavers
गोवा

Drishti Lifesavers Rescue: पर्यटकांसाठी जीवरक्षक म्हणजे देवदूतच!! तीन लहानग्यांना जीवनदान

Calangute Beach Goa: कांदोळीमधल्या समुद्र किनाऱ्यावर जीवरक्षकांनी तीन हरवलेल्या लहान मुलांची पुन्हा पालकांसोबत भेट घडवून दिली

Akshata Chhatre

Calangute News: डिसेंबर महिन्यात खास करून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढते. गोवा म्हटलं म्हणजे इथले समुद्रकिनारे अनेकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात, मात्र अनावधानाने या समुद्रकिनाऱ्यांवर होणारे अपघात रोखण्यासाठी आणि पर्यटकांची सुरक्षितता निश्चित करण्यासाठी काही जीवरक्षकांचे पथक या किनाऱ्यांवर कायम तैनाद असते. अनेकवेळा या जीवरक्षकांनी पर्यटकांचे जीव वाचवले आहेत. कांदोळीमधल्या समुद्र किनाऱ्यावर जीवरक्षकांनी तीन हरवलेल्या लहान मुलांची पुन्हा पालकांसोबत भेट घडवून दिली.

हुब्बळी, कर्नाटक येथील हरवलेला एक आठ वर्षांचा मुलगा कांदोळीहून कलंगुट पर्यंत गेला, त्याला गोव्याबद्दल काहीही माहिती नसल्याने तो बऱ्यापैकी घाबरला होता, मात्र दृष्टी मरीनच्या जीवरक्षकांनी त्याला पुन्हा पालकांजवळ नेऊन सोडले.

याप्रमाणेच चंदीगड येथील ११ वर्षांची दोन लहानमुलं पालकांपासून विभक्त झाली होती. नवीन जागेत पालकांना कसं शोधावं हा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होता, मात्र वेळीच त्यांच्या मदतीला धाव घेत समुद्र किनाऱ्यावरील जीवरक्षकांनी त्यांच्या पालकांना शोधून पुन्हा भेट घडवून दिली.

गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या या जीवरक्षकांमुळे पर्यटक तसेच किनाऱ्यावर फिरायला आलेले स्थानिक सुरक्षित असतात. अलीकडेच या जीवरक्षकांनी बागा समुद्रकिनाऱ्यावर जोरदार लाटेमुळे वाहून गेलेल्या महाराष्ट्रातील एका ३३ वर्षीय पर्यटकाला सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणत जीवनदान दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pisurle: विद्यार्थ्यांनी फुलविली झेंडूची फुले, पिसुर्ले सरकारी विद्यालयात 'ग्रीन वॉरिअर इको' क्लबचा स्तुत्य उपक्रम

Horoscope: आजचा दिवस 'गोल्डन' ठरणार! मिथुन, कर्कसह 'या' 4 भाग्यवान राशींना करिअरमध्ये मोठे यश, वाचा तुमचे भविष्य

Goa Live News: कदंब बसच्या धडकेत 23 वर्षीय तरुणी ठार, एकजण जखमी; वेर्णा येथे झाला अपघात

Tilak Varma: आशिया कपमध्ये कमाल, आता तिलक वर्मा करणार कॅप्टन्सी! टीमची झाली घोषणा; पाहा संपूर्ण संघ

BJP Rath Yatra Goa: भाजपतर्फे 25 डिसेंबरपर्यंत रथयात्रा, पदयात्रा; मतदारसंघनिहाय मेळावे होणार, स्वदेशीचा नारा करणार बुलंद

SCROLL FOR NEXT