म्हापसा: उत्तर गोव्यातील बागा समुद्रकिनाऱ्यावर काल ( दि. २५ ऑक्टोबर) रोजी दृष्टी जीवनरक्षकांनी आंधळ्या व्यक्तींचा जीव वाचवला. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास वयवर्ष २२ ते ४३ च्या वयोगटातील तीन पुरुष व एका महिलेला जीवनरक्षकांनी जीवनदान दिले. या गटातील चारही लोकं आंधळी असल्याने समुद्राच्या लाटांचा वाढलेला जोर त्यांच्या लक्षात आला नाही आणि समुद्राच्या लाटांनी त्यांना खेचून नेलं.
दिसत नसल्याने ही चारही लोकं हतबल होती. त्यांना आपण पाण्यात बुडतोय हे ठाऊक असून देखील काहीही करता येत नव्हतं. विनोद गावकर, फोंदू गावास, सूर्यकांत पर्येकर हे जीवनरक्षक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि सर्फबोर्ड तसेच रेस्क्यू ट्यूबच्या साहायाने चार जणांचा जीव वाचवला.
काही महिन्यांपूर्वी कळंगुट समुद्रकिनारी पोहताना लाटांमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील २२ वर्षीय तरुणाची आणि १८ आणि २१ वर्षीय दोन स्थानिक तरुणांची जीवरक्षक दलाने सुटका केली होती. तर कळंगुट समुद्रकिनाऱ्याजवळ पाण्यात बुडणाऱ्या कर्नाटकातील (Karnataka) ३५ वर्षीय व्यक्तीसह अन्य तीन जणांनाही वाचवण्यातदेखील त्यांना यश मिळालं होतं.
कांदोळी समुद्रकिनाऱ्यावर रिप करंटमध्ये अडकलेल्या ५० वर्षीय रशियन नागरिकाला सुरक्षितरित्या किनाऱ्यावर आणण्यात जीवरक्षक दल यशस्वी झाले होते. गोव्यात पर्यटक अडचणीत असले की जीवरक्षक त्यांच्यासाठी देवदूतासारखे धावून येतात. याची प्रचिती अशा प्रसंगांमधून येते. जीवनरक्षकांनी अनेकवेळा समुद्रावर आलेल्या पर्यटकांच्या जीव वाचवले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.