Manmohan singh condolence meeting Dainik Gomantak
गोवा

Congress Leaders Missing :मनमोहन सिंग यांच्या शोकसभेला काँग्रेस पदाधिकाऱ्यांची दांडी; आमदार एल्टन, कवठणकरांची अनुपस्थिती

Manmohan singh condolence meeting goa: प्रदेश काँग्रेस समितीच्यावतीने दिवंगत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासाठी इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा संस्थेच्या सभागृहात शोकसभा आयोजित केली होती.

Sameer Panditrao

Manmohan Singh tribute events in Panaji

पणजी: पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या शोकसभेला काँग्रेसच्याच महत्त्वाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी दांडी मारल्याचे दिसून आले. प्रदेश काँग्रेस समितीने पणजीत आयोजित केलेल्या शोकसभेला अत्यंत कमी उपस्थिती दिसून आल्याने व्यासपीठावरून थेट नाराजी व्यक्त करण्यात आली.

प्रदेश काँग्रेस समितीच्यावतीने दिवंगत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासाठी इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा संस्थेच्या सभागृहात रविवारी सायंकाळी ४ वाजता शोकसभा आयोजित केली होती. या शोकसभेला प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, उपाध्यक्ष एम. के. शेख, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार कार्लोस फेरेरा, माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, माजी आमदार व्हिक्टर गोन्साल्विस, प्रवक्ते विजय भिके, मिडिया विभागाचे प्रमुख अमरनाथ पणजीकर, डॉ. प्रमोद साळगावकर, उत्तर व दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष, तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी खास करून अनुपस्थिती दिसून आली ती खासदार व्हिरियातो फर्नांडिस, आमदार एल्टन डिकॉस्ता, माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, उपाध्यक्ष सुनील कवठणकर, एल्विस गोम्स, नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ज्योएल आंद्रादे यांची. सुरुवातीला व्यासपीठावर ठेवलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रतिमेला उपस्थितांनी पुष्पांजली अर्पण केली.

पाटकर म्हणाले, डॉ. मनमोहन सिंग यांच्या जाण्याने केवळ काँग्रेस पक्षाचेच नाहीतर देशाचे नुकसान झालेले आहे. देशातील जनकल्याणाचे दिलेले वचन त्यांनी विविध योजना राबवीत अमलात आणले.

युरी आलेमाव यांनी गोव्यात पक्षाचे ऑब्झर्व्हर म्हणून जेव्हा मनमोहन सिंग आले होते, तेव्हाच्या आठवणींना आपल्या भाषणात उजाळा दिला. ॲड. खलप यांनी डॉ. सिंग यांच्याशी राहिलेल्या स्नेहसंबंधांविषयी आणि त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला दिलेली दिशा याविषयी मत व्यक्त केले. याशिवाय आमदार फेरेरा, पणजीकर, राजन घाटे, डॉ. साळगावकर, माजी आमदार गोन्साल्विस यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विजय भिके यांनी या सभेला कमी दिसून आलेल्या उपस्थितीविषयी थेट नाराजी व्यक्त केली.

गोव्यातही सात दिवस दुखवटा जाहीर करा : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशभरात केंद्र सरकारतर्फे सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे गोवा सरकारलाही हा आदेश लागू होत असल्याने या आदेशाचे सन्मानपूर्वक सन्मान करणे आणि त्याचा आदर करणे गरजेचे आहे, असे मत माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केले आहे. पोलिसांनी रात्री ९:४५ च्या १० वाजण्यापूर्वी संगीतावर बंदी घालणे आवश्यक आहे. पणजीममधील तरंगत्या कॅसिनो जहाजे मध्यरात्रीनंतर मोठ्या आवाजात संगीत वाजविले जात आहे. तसेच सनबर्न फेस्टिव्हलसारख्या ध्वनी प्रदूषणाची व वेळेची मर्यादा न पाहता सुरू आहेत. भाजपच्या राजवटीत हे प्रकार भ्रष्टाचार आणि कायद्यांना फाटा देणारे आहेत.

आजारामुळे अनुपस्थित!

डॉ. सिंग यांच्या शोकसभेला काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली होती. त्यात माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची गैरहजेरी प्रामुख्याने दिसून आली. त्याविषयी चोडणकर यांच्याशी ‘गोमन्तक''ने संपर्क सांधला असता, त्यांनी आपली तब्बेत ठीक नसल्याने आपण हजर राहू शकलो नाही, असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT