Manmohan Singh: 'मी गोव्यात काय करू', जेव्हा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पडला होता प्रश्न

Manmohan Singh Goa Visit: मनमोहन सिंग यांंना एक दिवसाच्या सुट्टीसाठी तयार करणे देखील अवघड होते, असे संजय बारु सांगतात.
Manmohan Singh
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन.Sakal
Published on
Updated on

Manmohan Singh Passes Away

पणजी: देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी नवी दिल्लीत निधन झाले. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना गुरुवारी (२६ डिसेंबर) रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग यांना भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ म्हणून देखील त्यांची जगभरात ओळख होती. देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांचा कार्यकाळ नेहमीच लक्षात ठेवला जाईल.

मनमोहन सिंग नेहमीच स्वत:ला कामात व्यस्त ठेवत. सिंग यांना उपीन्दर, दमण आणि अमृत अशा तीन मुली होत्या . दुसरी मुलगी दमण यांनी बाबा मनमोहन सिंग यांच्याबाबत आठवणींना उजाळा देताना, 'ते सतत काम करत असायचे', असे सांगितले. तसेच, 'आम्हाला वाढदिवासाला पुस्तक गिफ्ट म्हणून मिळायचे. दिल्लीतील कनॉट पॅलेस येथील पुस्तक दुकानात आम्ही खरेदी करायचो', अशी आठवण दमण सांगतात.

'चाळीस वर्षात ते आम्हाला एकदाच नैनिताल येथे फिरायला घेऊन गेले होते. कुटुंबियांसोबत ती तीन दिवसांची ट्रीप होती', अशी आठवण त्यांनी 2011 मध्ये एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितली होती.

सिंग यांंना एक दिवसाच्या सुट्टीसाठी तयार करणे देखील अवघड होते, असे The Accidental Prime Minister पुस्तकाचे लेखक संजय बारु सांगतात. बारु यांनी मनमोहन सिंग यांचा गोव्यातील एक किस्सा सांगितला आहे. पणजीत बिर्ला तंत्रज्ञान संस्थेचा उद्घाटन समारंभ होता. सकाळी गोव्यात जाऊन उद्घाटनाचा कार्यक्रम उरकून सायंकाळी पुन्हा दिल्लीत येण्याचे नियोजन होते.

Manmohan Singh
Manmohan Singh passed away: देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन

दरम्यान, वीकेंड असल्याने शनिवारी सकाळी उद्घाटनानंतर येथेच थांबावे आणि रविवारी सकाळी बीचवर थोडा वेळ व्यतित करुन सायंकाळी माघारी जाऊयात, अशी विनंती मी त्यांना केली. पण, "मी गोव्यात काय करु?" असा प्रश्न मनमोहन यांना केल्याची आठवण बारु सांगतात.

पाकिस्तानमधील गाह गावी 26 सप्टेंबर 1932 रोजी जन्मलेल्या मनमोहन सिंग यांचा २६ डिसेंबर २०२४ रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी मृत्यू झाला आहे. मनमोहन यांनी वाणिज्य मंत्रालयात सल्लागार, भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते ते भारताचे पंतप्रधान म्हणून काम केले आहे. पंतप्रधान म्हणून त्यांची कारकिर्द यशस्वी मानली जाते. तसेच, देशाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com