Domnic-Joan Case Dainik Gomantak
गोवा

Goa News: धर्मांतरण केल्याप्रकरणी डॉम्निक डिसोझा अटकेत

Goa News: तिसऱ्यांदा कारवाई: पत्नीविरुद्धही गुन्हा दाखल

दैनिक गोमन्तक

Goa News: फसवणूक व बेकायदेशीर धर्मांतरण घडवून आणण्याच्या आरोपाखाली सडये-शिवोली येथील फाइव्ह पिलर्स चर्चचे धर्मगुरू डॉम्निक डिसोझा यांना तिसऱ्यांदा म्हापसा पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी डॉम्निक यांची पत्नी जोन मास्कारेन्हस व अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कुर्टी-फोंडा येथील 40 वर्षीय वादीवेल यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार सोमवारी पहाटे पोलिसांकडून कारवाई करण्‍यात आली. तक्रारीनुसार, धर्मांतराचा प्रकार ३१ डिसेंबर २०२३ रोजी, सडये येथील फाइव्ह पिलर्स चर्चस्थळी घडला. संशयित डॉम्निक डिसोझा व इतरांनी फिर्यादीस धर्मांतरासाठी धमकावले. तसेच फिर्यादीस संशयितांनी सांगितलेला व प्रचारित केलेला धर्म स्वीकारण्याचे आमिष दाखवण्यात आले आणि त्यांच्या

धार्मिक भावनाही दुखावल्या, असे तक्रारीत म्हटले आहे. संशयित डॉम्निक यांच्याविरुद्ध अशाच कलमांतर्गत नोंदविलेला हा तिसरा गुन्हा असून विविध कलमांतर्गत आणखी पाच गुन्हे यापूर्वी दाखल केले आहेत. त्यांच्याविरुद्ध एकूण ८ गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी दिली.

डॉम्निकला २ दिवसांची पोलिस कोठडी

बेकायदेशीर धर्मांतर घडवून आणण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या डॉम्निक डिसोझा याने न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. तर, सोमवारी डॉम्निकला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मात्र, सध्या डॉम्निकला अस्वस्थ वाटत असल्याने तो म्हापशातील जिल्हा इस्पितळात भरती आहे. दरम्यान, सोमवारी दुपारी म्हापसा पोलिसांनी फाइव्ह पिलर्स चर्चस्थळी जाऊन तिथे फॉरेन्सिक टीमसोबत पंचनामा केला. यावेळी पोलिसांनी काही कागदोपत्री पुरावे हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पोलिसांनी डॉम्निक यांच्या पत्नी म्हणजेच जोआना मास्करेन्हास आणि फाइव्ह पिलर्स चर्चच्या लिपिक प्रिथीला गावकर यांनाही समन्स बजावले आहे.

डॉम्निक इस्पितळात

डॉम्निक यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया यापूर्वी झालेली आहे. अटक केल्यानंतर त्यांनी आपल्याला अस्वस्थ व छातीत दुखत असल्याची तक्रार करताच पोलिसांनी त्यांना म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात भरती केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT