Goa Heart Attack Death
Goa Heart Attack Death Dainik Gomantak

गोव्याची ट्रीप ठरली अखेरची; तरुणाचा हार्ट अ‍ॅटॅकने मृत्यू

हॉटेलच्या खोलीत एकट्याला सोडून मित्र बाहेर फिरायला गेले असताना घडली घटना
Published on

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातून गोव्यात फिरायला आलेल्या एका तरूणाचा हार्ट अ‍ॅटॅकने मृत्यू झाला. त्यामुळे या तरूणाची ही गोवा ट्रिप अखेरची ठरली आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील अहमदनगर मोहल्ला येथे वास्तव्यास होता. अर्शद खान (वय 35) असे त्याचे नाव आहे.

अरशद हा त्याच्या मित्रांसह गोव्याला गेला होता. तो गोव्याची ट्रिप करून परतला. त्यानंतर रविवारी रात्री 2 वाजता अर्शद त्याच्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळून आला.

त्याच्या मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचा मृतदेह परत आणण्यासाठी घरातल्यांनी तयारी सुरू केली आहे. हिंदी प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.

Goa Heart Attack Death
Goa Maleria Cases: दक्षिण गोवा जिल्ह्याची मलेरिया मुक्तीच्या दिशेने वाटचाल; राज्यात वर्षभरात एकही रूग्ण नाही...

अर्शद हा परिसरातील मदिना मशिदीजवळ खाजगी दवाखाना चालवत होता. त्याच्या शेतकरी वडिलांचाही सहा महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. अर्शदच्या पश्चात पत्नी हुमा आणि पाच वर्षांचा मुलगा आहे.

अर्शद 8 डिसेंबर रोजी त्याचा चुलत भाऊ हाफिज आणि इतर मित्रांसह गोव्याला गेला होता. सर्वजण गोव्यात एन्जॉय करून परतले होते. रविवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अर्शद खोलीत असताना इतर मित्र बाहेर फिरायला गेले होते.

रात्री दोन वाजण्याच्या सुमारास सर्वजण हॉटेलमधील आपापल्या खोलीत परतले असता अर्शद बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. प्रयत्न करूनही अर्शदला शुद्ध आली नाही.

Goa Heart Attack Death
Goa Tourism: गोव्याच्या पर्यटनात मंदिरे दाखवा, कमी कपड्यातील महिला असलेले बीच नको; हिंदू जनजागृती समितीची मागणी

त्यानंतर मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. डॉक्टरांनी हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, अमरोहा शहरात तीन दिवसांत हृदयविकाराच्या झटक्याने झालेला हा तिसरा मृत्यू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com