Theft In Goa: मोबाईल चोरीप्रकरणी तीन टोळ्यांचा पर्दाफाश

Theft In Goa: पोलिसांची कारवाई: 20 जणांना अटक, 60 मोबाईल जप्त
Calangute Theft Case
Calangute Theft CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Theft In Goa: सनबर्न ईडीएम फेस्टीव्हल काळात तसेच उत्तर गोवा किनारपट्टी भागातील गर्दीच्या ठिकाणी पर्यटक तसेच स्थानिकांचे मोबाईल लंपास करणाऱ्या 20 जणांच्या तीन टोळ्यांना कळंगुट पोलिसांनी गजाआड केले आहे. या तीन टोळ्यांतील चोरट्यांकडून 60 मोबाईल जप्त केले असून त्याची किंमत सुमारे 45 लाख रुपये आहे.

Calangute Theft Case
Goa Accident: ‘थर्टिफर्स्ट’ची रात्र चौघांना ठरली अखेरची!

विविध पोलिस स्थानकांत 190 मोबाईल चोरीच्या तक्रारी नोंद झाल्या असून त्याची किंमत सुमारे दीड कोटी रुपये आहे. आत्तापर्यंत मोबाईल चोरीप्रकरणी 37 जणांना अटक करून सुमारे 90 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत व त्याची किंमत सुमारे 70 लाखांच्या आसपास असल्याची माहिती उत्तर गोवा पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली.

सनबर्नच्या काळात हणजूण पोलिसांनी मोबाईल चोरीप्रकरणी सातजणांच्या टोळीला गजाआड केले होते व त्यांच्याकडून २९ मोबाईल्स जप्त केले होते. त्याची किंमत सुमारे २५ लाख रुपये होते. जप्त करण्यात आलेल्या या मोबाईलमध्ये महागडे व ब्रँडेड कंपनीच्या मोबाईलचा समावेश आहे. तीन वेगवेगळ्या टोळ्या पकडण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पश्‍चिम बंगाल, महाराष्ट्र व राजस्थान - दिल्ली येथील चोरट्यांचा समावेश आहे.

मोबाईल्स चोरीप्रकरणी कळंगुट पोलिस स्थानकात नोंद झालेल्या तक्रारींच्या आधारे पर्वरीचे पोलिस उपविभागीय अधिकारी विश्‍वेश कर्पे व कळंगुटचे पोलिस निरीक्षक परेश नाईक यांनी या टोळ्यांना गजाआड करण्यात यश मिळवले.

मोबाईल चोरीच्या १९० तक्रारी

जप्त करण्यात आलेल्या मोबाईलची ओळख पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीवरून पटवण्यात येत आहे. कळंगुट पोलिस स्थानकात १००, तर हणजूण पोलिस स्थानकात ९० मोबाईल चोरीस गेल्याच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत. या तक्रारी नाताळ ते ३१ डिसेंबरपर्यंतच्या आहेत.

चार दिवसांत ३७ जणांना अटक

गेल्या ४ दिवसांत म्हापसा, कळंगुट व हणजूण पोलिसांनी आत्तापर्यंत ९० मोबाईल्स जप्त केले आहेत व ३७ जणांना अटक केली आहे. चोरट्यांवर नजर ठेवण्यासाठी कांदोळी पंचायतीने पोलिसांना जागा देऊन मदत केली. त्यामुळे चोरट्यांवर नजर ठेवण्यास पोलिसांना शक्य झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com