CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: विकासासाठी प्रकल्पांना विरोध नकोच : मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत

CM Pramod Sawant: सांतआंद्रेच्या नवीन पंचायतघराचे लोकार्पण

दैनिक गोमन्तक

CM Pramod Sawant: राज्याचा विकासासाठी चांगल्या प्रकल्पांना विरोध होऊ नये. आज मोठ्या संख्येने युवक रोजगारासाठी परदेशात जात आहेत. त्याच संधी येथे मिळाल्यास युवाते येथेच राहणार. त्यासाठी पंचसदस्यांनी प्रकल्पांचे समर्थन करून जनतेच्या मनात त्यासंदर्भात विश्वास निर्माण केला पाहिजे, असे वक्तव्‍य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

सांतआंद्रे पंचायतीच्या (गोवा वेल्हा) नवीन पंचायतघराच्या लोकार्पण सोहळ्यात मुख्‍यमंत्री मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर, जिल्हा पंचायत सदस्य धाकू मडकईकर, माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, सांतआंद्रे सरपंच एमिलिया कायाद, उपसरपंच मोनिका मिरांडा व इतर पंचसदस्य उपस्थित होते. त्‍यांनीही आपापले विचार मांडले.

सांतआंद्रे पंचायतीच्या (गोवा वेल्हा) नवीन सभागृहाला स्वातंत्र्यसैनिक विश्‍‍वनाथ लवंदे यांच्या स्मरणार्थ काका लवंदे असे नाव द्यावे. त्यांच्‍या शंभराव्‍या जयंतीसाठी सरकारकडून मदत केली जाईल. त्यासाठी कार्यक्रमाचा सविस्तर प्रस्ताव पंचायतीने सादर करावा.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Peace University: तंत्रज्ञानाने जग जवळ आले, पण मने दूरच! विश्वशांतीसाठी राज्यपालांचे महत्त्वाचे आवाहन; 'डब्ल्यूपीयू'च्या परिषदेचे थिवीत उद्‌घाटन

खरी कुजबुज: मंत्र्यांचा पाठिंबा नेमका कोणाला?

Bungalow Sale Fraud: बंगला विक्रीचे आमिष दाखवून निवृत्त कर्मचाऱ्याला गंडा; 99.50 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

America School Shooting: अमेरिकेतील प्राथमिक शाळेत अंधाधुंद फायरिंग! 3 चिमुकल्यांसह 5 जणांचा मृत्यू, 16 वर्षांचा हल्लेखोरही ठार; परिसरात खळबळ

Goa Cricket Association Audit: जीसीएचा कारभार वादात! 50 कोटींच्या व्यवहारांवर लेखापरीक्षणात गंभीर आक्षेप; चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT