Vijai Sardesai  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: संडे डायलॉगसह विजय सरदेसाई 'फॉरवर्ड'; इंडिया आघाडीत कही खुशी, कही गम

Goa India Alliance: आरएसएस कार्यकर्ते, आरजी उमेदवार आणि भाजप सहयोगी हे कुडचडे येथील ‘संडे डायलॉग’ चा प्रचार कसा करू शकतात? असा सवाल

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: आरएसएस कार्यकर्ते, आरजी उमेदवार आणि भाजप आमदार नीलेश काब्राल यांचे सहयोगी हे गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांच्या कुडचडे येथील ‘संडे डायलॉग’ चा प्रचार कसा करू शकतात? असा सवाल काँग्रेसने विचारला असून यावरून ‘इंडिया’त विसंवाद असल्याचे पुढे आले आहे.

जी व्यक्ती मनाने काँग्रेसमन आहे, ती काँग्रेसच्या विचारधारेसाठी खंबीरपणे उभी राहील. कॉंग्रेसची विचारधारा पूर्णपणे भाजप आणि आरएसएस विचारसरणीच्या विरोधात आहे, असे काँग्रेस सरचिटणीस श्रीनिवास खलप यांनी म्हटले आहे.

या संबंधी त्यांनी आज प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात, कुडचडेचे भाजप आमदार नीलेश काब्राल यांच्या निकटचे पुष्कल सावंत, ‘आरजी’चे २०२२ चे विधानसभा निवडणूक उमेदवार आदित्य देसाई, ‘आरएसएस’चे कौस्तुभ भिसे तसेच स्थानिक नगरसेवक बाळकृष्ण होडारकर यांच्या ‘गोवा फॉरवर्ड’चे पदाधिकारी विकास भगत यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थितीवर कॉंग्रेसने सवाल उपस्थित करुन एकंदर ‘संडे डायलॉग’ आयोजण्याच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. आणि या विषयावर समाज माध्यमांवर मोहीम सुरू केली आहे.

या मोहिमेत काँग्रेसचे सोशल मीडिया विभाग प्रमुख दिव्या कुमार यांनीही भाग घेताना, मी मनापासून काँग्रेस विचारसरणीचा आहे आणि मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा सदस्य आहे, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी काँग्रेसशी एकनिष्ठ राहीन. मी कधीही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भाजपला पाठिंबा दिला नाही. मी एक निष्ठावान, शिस्तप्रिय काँग्रेस कार्यकर्ता आहे, असे म्हटले आहे.

भाजप आणि आरएसएस कार्यकर्त्यांशी हातमिळवणी करणाऱ्या ज्ञात-अज्ञात शक्तींना विरोध करण्यास मी वचनबद्ध आहे, असे काँग्रेस समाजमाध्यम विभाग समन्वयक शमिला सिद्दिकी यांनी म्हटले आहे.

‘गोवा फॉरवर्ड’चे विकास भगत यांच्या कुडचडेतील शनिवारच्या पत्रकार परिषदेत आमदार काब्राल, आरएसएस यांच्याशी जवळीक असलेले उपस्थित होते हे सिद्ध करण्यासाठी कॉंग्रेसने काही छायाचित्रे प्रसिद्ध केलीत ज्यात पुष्कल सावंत व कौस्तुभ भिसे हे भाजपकडे असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

दुर्गादास कामत यांनी सदर ‘संडे डायलॉग’ सर्व ४० मतदारसंघात होणार असल्याचे वक्तव्य केल्यानंतर लगेच मोरेनो रिबेलो यांनी त्यावर तिखट प्रतिक्रीया दिली होती.

... काँग्रेसने प्रमाणपत्र देण्याची गरज नाही!

गोवा या सरकारने विकायला काढला असून गोवा वाचविण्यासाठी मी संपूर्ण गोव्यात फिरणार असून चाळीसही मतदारसंघात जाऊन जागृती करणार आहे, असे आमदार विजय सरदेसाई यांनी कुडचडेत संडे डायलॉगमध्ये सांगितले. कुडचडेत भाजपचा आमदार आहे व त्यांनी बैठकी विरोधात आवाज काढला असता तर समजू शकले असते.

पण काँग्रेसने या बैठकीला विरोध करणे हे हास्यास्पद आहे. काँग्रेसने मला प्रमाणपत्र देण्याची गरज नाही, मी काँग्रेससाठी काय केले आहे, ते लोकांना माहीत आहे, असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session:राज्यात अनेक घर फोड्या करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केलेल्या आरोपीला अटक

Goa Assembly: परराज्यातील दुचाकींची राज्यात नोंदणी व्हावी! दिलायला लोबोंची मागणी; टॅक्सी व्यवसाय संरक्षित करा असे आवाहन

GIDC:‘आयडीसी’च्या संचालकांवर गुन्हे नोंदवा! फेरेरांची मागणी; वित्तीय शिस्त न पाळल्याचा ठेवला ठपका

Ferry Boat Repair: फेरीबोटींवर 35 कोटींपेक्षा अधिक खर्च! आकडेवारीत विसंगती असल्याचा दावा; युरी-फळदेसाई यांच्यात जुंपली

Goa Politics: खरी कुजबुज; गोव्यातील ठेकेदार सुटले कसे?

SCROLL FOR NEXT