Reddit Viral Post Dainik Gomantak
गोवा

Viral Post: दिल्ली में तो पनीर सब जगह मिल जाता हैं! गोव्यातील रेस्टॉरंटमध्ये महिलेचा राडा; नेटकऱ्यांनी शिकवला 'कॉमन सेन्स'

Social Media Viral Post: दक्षिण गोव्यात गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर भारतातून आलेल्या महिला पर्यटकाने रेस्टॉरंटमध्ये जेवणावरुन दंगा करत गोंधळ घातल्याचा प्रकार घडला.

Pramod Yadav

पणजी: "ये चिंकी लोग इधर आ जाते हैं और हमें क्या चाहिए वो नहीं देते, हमारे दिल्ली में तो पनीर सब जगह मिल जाता हैं", असे म्हणत एका उत्तर भारतीय महिला पर्यटकाने दक्षिण गोव्यातील रेस्टॉरंटमध्ये गोंधळ घातला. या घटनेवरुन Reddit या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर चर्चेला उधाण आले आहे.

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात देश - विदेशातून विविध पर्यटक दाखल होत असतात. गोव्यात येणारे विविध अनुभव, घडणारे विविध प्रसंग आणि सामाजिक विषय आणि समस्यांवर Reddit या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर चर्चा होत असतात. दक्षिण गोव्यात गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर भारतातून आलेल्या महिला पर्यटकाने रेस्टॉरंटमध्ये जेवणावरुन दंगा करत गोंधळ घातल्याचा प्रकार घडला, अशा आशयाची पोस्ट एका व्यक्तीने रेडिटवर शेअर केली आहे.

काय आहे पोस्ट?

"ईशान्य भारत आणि नेपाळी कर्मचारी चालवत असलेल्या एका दक्षिण गोव्यातील रेस्टॉरंटमध्ये मी बसलो होतो. रेस्टॉरंटमध्ये बहुतांश लोक परदेशी पर्यटक होते. मी एकटाच भारतीय तिथे होतो. दरम्यान, एक कार आली रस्त्याच्या मधोमध थांबली. कारमधून एक दाम्पत्य उतरले. दोन वर्षाच्या मुलासह महिला रेस्टॉरंटच्या दिशेने चालत आली. रेस्टॉरंटमध्ये येताच तिने पनीर - रोटीची ऑर्डर दिली. रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांनी हे खाद्यपदार्थ उपलब्ध नसल्याचे सांगितले. तसेच, त्याचा मेनूत देखील उल्लेख नसल्याचे नर्मपणे त्या कर्मचाऱ्याने सांगितले."

"यावरुन महिलेचा सयंम तुटला आणि ती मोठ्या आवाजात आपल्या लहान मुलावर ओरडू लागली. "ये चिंकी लोग इधर आ जाते हैं और हमें क्या चाहिए वो नहीं देते, हमारे दिल्ली में तो पनीर सब जगह मिल जाता हैं", असे ती महिला आपल्याच मुलावर ओरडत म्हणाली."

"महिला एवढ्यावरच न थांबता रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांवर आरडाओरडा करु लागली. या गोंधळामुळे अनेकजण रेस्टॉरंटमधून उठून जाऊ लागली. महिलेने कर्मचारी भेदभाव करत असल्याचे म्हणत भारतीय पर्यटकांना व्यवस्थित सुविधा देत नसल्याचा आरोप केला. महिलेचा पती कार पार्क करुन तिथे आल्यानंतर त्याला सर्व प्रकाराचे कथन करण्यात आले. तरी देखील महिला कर्मचाऱ्यांवर आरडाओरडा करत होती. आणि त्यांना चिंकी म्हणत होती (या शब्दाचा अर्थ मात्र कळू शकला नाही)."

"यानंतर मी रेस्टॉरंटमधून बाहेर पडलो. त्या महिलेशी काही बोलण्याची देखील सोय नव्हती. मी जर रेस्टॉरंटचा मालक असतो तर दहा सेकंदात त्यांना बाहेर हाकललं असतं. मला वाटतं आपल्याच लोकांचा सन्मान करायला आपण शिकलं पाहिजे," असं या पोस्टमध्ये म्हटले आहे.

लोकांनी काय प्रतिक्रिया दिल्यात?

या पोस्टमध्ये कथन केलेल्या प्रसंगावरुन नेटकऱ्यांनी महिलेच्या स्वभाव आणि पर्यटकांच्या उद्धट वागण्याचा समाचार घेतला आहे. रेस्टॉरंटमधील कर्मचारी आपल्याकडील होते त्यामुळे महिलेने तसे वागण्याचे धाडस केले. कर्मचारी रशियन किंवा इस्त्रायलचे असते तर फार विचारपूर्वक आणि अदबीनं वागली असती, अशी प्रतिक्रिया एका रेडिट युझरने दिली आहे.

१० - २० वर्षापूर्वी कोणत्याही खेळात खेळताना आम्ही दिल्ली टीमचे कौतुक करायचो. त्यावेळी वेगळी परिस्थिती होती. पण, अलिकडे या लोकांनी त्यांनी ओळख गमावली आहे. दिल्लीचे लोक खूप रागीट आणि तेवढेच बावळट झालेत, असं मत दुसऱ्या एका युझरने मांडले आहे.

Reddit Post
Reddit Post

दिल्लीत समुद्र नाही, त्यामुळेच तर तुम्ही येथे आलात. भूगालचा शाळेत अभ्यास केला नाही का? प्रत्येक राज्य आणि तेथील खाद्यसंस्कृती वेगळी असते, अशी प्रतिक्रिया आणखी एका युझरने दिली आहे.

तर, दुसऱ्या एका युझरने खोचक प्रतिक्रिया देत चायनीज रेस्टॉरंटमध्ये जा आणि 'पनीर मागव', असा सल्ला दिला आहे.

Reddit Post

दिल्लीचाच असल्याचा दावा करणाऱ्या आणखी एका युझरने माझा जन्म दिल्लीत झालाय पण मी असे वागण्याचा विचारच करु शकत नाही. पहिल्यांदा मेनू पाहावा हा कॉमन सेन्स आहे. त्यानंतर काय आहे, नाही हे चेक करावे. जेवणावरुन कोणी भेदभावाचा आरोप करतं काय? गुगल मोफत आहे. त्याचा वापर करुन कुठे मिळतेय पनीर तिथं जावं, अशा शब्दात या नेटकऱ्याने मत व्यक्त केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT