Konkan Railway: ऑपरेशन अमानत! हरवलेले तीन लाख किंमतीचे सौभाग्याचे प्रतीक रेल्वे पोलिसांमुळे मिळाले परत

Thivim Railway Station: या बॅगमध्ये तीन लाख रुपये किंमतीचे मंगळसूत्र आणि वीस हजार रुपयांची रोकड होती.
Thivim Railway Station
Konkan RailwayDainik Gomantak
Published on
Updated on

थिवी: रेल्वेतून प्रवास करताना बऱ्याचवेळा साहित्य गहाळ होण्याची शक्यता आहे. वारंवार अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, गोव्यातून एक अशीच घटना समोर आली असून, हरवलेले तीन लाख किंमतीचे दागिने आणि वीस हजारांची रोकड रेल्वे पोलिसांनी प्रवाशाला परत केलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, थिवी रेल्वे स्थानकावर एका प्रवाशाची दागिने आणि पैसे असलली बॅग गहाळ झाली. प्रवाशांना बॅग गहाळ झाल्याची तक्रार रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ घटनेची दखल घेऊन शोध घेतला असता प्रवाशाची बॅग मिळाली आहे. या बॅगमध्ये तीन लाख रुपये किंमतीचे मंगळसूत्र आणि वीस हजार रुपयांची रोकड होती.

Thivim Railway Station
Goa Crime: 40 किलोंच्या 'ढोल'ची चोरी! खिडकी तोडून तांब्याची भांडीही पळवली; भंगार गोळा करणाऱ्या महिलांवर संशय

रेल्वे पोलिसांमुळे प्रवाशाला बॅग आणि बॅगतील किमती दागिने परत मिळण्यास मदत झाली. पोलिसांकडून तातडीने मिळालेल्या मदतीबद्दल प्रवाशाने रेल्वे पोलिसांचे आभार मानले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com