Mankurad Mango Price: म्हापसा बाजारात मानकुरादची 'शाही' एन्ट्री; एक डझन आंब्यासाठी मोजावे लागतायेत 'एवढे' रुपये

Mankurad mango price Mapusa market: गोव्याची शान आणि फळांचा राजा मानल्या जाणाऱ्या 'मानकुराद' आंब्याने म्हापसा बाजारात दणक्यात एन्ट्री केली आहे.
Mankurad Mango Price
Mankurad Mango PriceDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: गोव्याच्या मातीचा सुवास ज्या फळात दडलेला आहे, तो 'मानकुराद' अखेर बाजारात दाखल झाला आहे. म्हापसा येथील प्रसिद्ध बाजारपेठेत मानकुराद आंब्याच्या टोपल्या दिसू लागल्या असल्या तरी, त्याचे दर ऐकून ग्राहकांचे डोळे विस्फारले आहेत. हंगामाच्या सुरुवातीलाच या आंब्याचा दर प्रति डझन ५ हजार रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच, एक आंबा खाण्यासाठी तुम्हाला किमान ४५० ते ५०० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

ग्राहकांची पसंती फक्त चौकशीलाच

बाजारात फेरफटका मारला असता असे दिसून आले की, अनेक आंबाप्रेमी आवर्जून मानकुरादच्या स्टॉलजवळ जात आहेत. मात्र, ५ हजार रुपये हा आकडा ऐकताच बहुतांश ग्राहक केवळ आंब्याचा सुगंध घेऊन आणि दराची चौकशी करून पुढे जात आहेत.

Mankurad Mango Price
Goa Politics: पणजी, फोंडा निवडणुकीवर भाजपने ठरविली रणनीती! गाभा समितीची बैठक, संघटनात्मक हालचालींना वेग

आवक वाढल्यास दर कमी होण्याची शक्यता

व्यापाऱ्यांच्या मते, सध्या बाजारात आलेला आंबा हा मोजक्याच बागांमधील आहे. हवामानातील बदलांमुळे यंदा हंगामावर थोडा परिणाम झाला असून सुरुवातीला आवक कमी आहे. मात्र, व्यापाऱ्यांनी असा दिलासा दिला आहे की, मार्च महिन्याच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या सुरुवातीला जेव्हा आंब्याची मोठी आवक सुरू होईल, तेव्हा हे दर निम्म्यावर येऊ शकतात. तोपर्यंत केवळ 'खास' ग्राहकांसाठीच हा आंबा उपलब्ध असल्याचे चित्र आहे.

Mankurad Mango Price
Goa Opinion: महासागरातील किती शिंपले वेचायचे? ‘पाव मात्रेला लय चुकली तर प्रलय होतो'; गावांतील संगीत संमेलनांतून आम्ही घडलो..

मानकुरादचे वेगळेपण

गोव्याचा मानकुराद हा त्याच्या रसाळ चवीसाठी आणि विशिष्ट सुगंधासाठी जगभरात ओळखला जातो. हापूसच्या तोडीस तोड मानला जाणाऱ्या या आंब्याची गोडवा आणि गर इतर कोणत्याही आंब्यापेक्षा वेगळा असतो. म्हणूनच, दर कितीही असले तरी या आंब्याची प्रतिष्ठा कायम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com