Gold, Silver Price: सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण, इराण युद्धाचा परिणाम; सुवर्ण बाजारात अस्थिरतेचे वातावरण

Gold, Silver Latest Price: अमेरिका व इराणच्या युद्धामुळे सोन्या-चांदीचे भाव रविवारी (ता. १) वाढले होते. मात्र, सोमवारी (ता. २) सोन्याच्या भावात दोन हजार ७०० रुपयांची घट झाली, तर चांदीचे भाव मात्र ‘जैसे थे’च होते.
Gold, Silver Price
Gold, Silver PriceDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई: अमेरिका व इराणच्या युद्धामुळे सोन्या-चांदीचे भाव रविवारी (ता. १) वाढले होते. मात्र, सोमवारी (ता. २) सोन्याच्या भावात दोन हजार ७०० रुपयांची घट झाली, तर चांदीचे भाव मात्र ‘जैसे थे’च होते. मात्र आजही सोन्याच्या भावात ५८०० रूपयांची, तर चांदीत २४ हजारांची घसरण झाली आहे. युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खेळते भांडवल नसल्यानेच ही घसरण झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सोमवारी (ता.२) सोन्याच्या भावात दोन हजार ७०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे सोने एक लाख ६७ हजार ८०० (प्रतिदहा ग्रॅम) विनाजीएसटी पोहोचले होते. आज (ता.४) सोन्याच्या भावात पुन्हा ५८०० रुपयांची घसरण झाली. आज विनाजीएसटी एक लाख ६२ हजार असा भाव होता.

Gold, Silver Price
Goa Opinion: महासागरातील किती शिंपले वेचायचे? ‘पाव मात्रेला लय चुकली तर प्रलय होतो'; गावांतील संगीत संमेलनांतून आम्ही घडलो..

शनिवारी (ता.२८) चांदी दोन लाख ९० हजार प्रतिकिलो होती. त्यात रविवारी (ता.१) पाच हजारांची वाढ झाली. चांदीचा भाव दोन लाख ९५ हजार प्रतिकिलो होता. बुधवारी मात्र चांदीच्या भावात २४ हजारांची एकदम घसरण होऊन भाव विनाजीएसटी दोन लाख ७१ हजार रुपये (प्रती किलो) पोचला आहे.

Gold, Silver Price
Goa Politics: पणजी, फोंडा निवडणुकीवर भाजपने ठरविली रणनीती! गाभा समितीची बैठक, संघटनात्मक हालचालींना वेग

रुपया नीचांकी पातळीवर

अमेरिका-इराण संकटाच्या पार्श्वभूमीवर, कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे बुधवारी भारतीय रुपया ६७ पैशांनी घसरून ९२.१६ या सार्वकालिक नीचांकी पातळीवर बंद झाला. त्याशिवाय, देशांतर्गत शेअर बाजारात देशी आणि परदेशी गुंतवणूकदारांनीही विक्री केल्याने रुपया आणखी घसरल्याचे परकी चलन व्यापाऱ्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com