Casinos In Mandovi : जागा शोधा आणि शिफ्ट व्हा! मांडवीतील कॅसिनोंचा उठ्या होणार; लवकरच सरकारी आदेश

Casinos in Goa: मांडवीत असणारे तरंगते कॅसिनो कधीही हटवले जाण्याची शक्यता आहे
Goa Casino News
Goa Casino NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मांडवीत असणारे तरंगते कॅसिनो कधीही हटवले जाण्याची शक्यता आहे. गोवा सरकारने संबधित कॅसिनोंना दोन वर्षांची मुदतवाढ दिली असली तरी २०२७ नंतर त्यांचे केव्हाही स्थलांतर होऊ शकते. याप्रकरणी आता स्थलांतरासाठी कॅसिनो चालकांना जागा शोधून स्थलांतरित होण्यास सांगण्याची शक्यता आहे.

राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते की वर्ष २०२७ पर्यंत मांडवी नदीवरील कॅसिनो व्यवसाय हटवावे लागणार आहेत आणि सरकारकडून स्थलांतरासाठी दिली गेलेली ही अंतिम मुदत असणार आहे.

Goa Casino News
Goa Casino: आता दोन वर्ष No Tension; मांडवीतील कॅसिनोंना 2027 पर्यंत मुदतवाढ

राज्य सरकाराकडून कॅसिनो व्यवसायांच्या स्थलांतरासाठी चार जागा देखील निश्चित केल्या होत्या. गृह विभाग आणि कॅप्टन ऑफ पोर्ट्स यांच्यामार्फत ऑफशोअर कॅसिनो स्थलांतरित करण्यासाठी निश्चित केलेल्या जागांमध्ये आग्वाद तुरुंगाजवळील मांडावी नदीचा भाग, झुआरी नदीतील दोन पर्यायी जागा आणि शापोरा नदीचा समावेश होता.मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे हा प्रस्ताव पुढे जाऊ शकला नाही. त्यामुळे आता कॅसिनो चालकांनीच पर्यायी जागा शोधणे चांगले यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

तत्कालीन भाजप सरकारने २०१२ च्या निवडणुकीत कॅसिनो व्यवसाय मांडवीवरून बाहेर काढण्याचे आश्वासन दिले होते. तसेच, २०१९ च्या पणजी पोटनिवडणुकीतील जाहीरनाम्यात आमदार बाबुश मोन्सेरात यांनी पणजीचे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर १०० दिवसांत ऑफशोअर कॅसिनो नदीतून हटवण्याचे आश्वासन दिले होते.

वर्ष २०१३ मध्ये भाजप सरकारने मांडावी नदीवरून कॅसिनो व्यवसाय हटवावे असा आदेश जारी केली होता मात्र पर्यायी जागा शोधण्यात अपयश आल्याने सरकारला मार्च २०१४ पासून मांडावीवरूनच कामकाज सुरू ठेवण्यासाठी अनेक मुदतवाढ द्याव्या लागल्या.

सध्या पणजीत मांडावी नदीवर सहा ऑफशोअर कॅसिनो कार्यरत आहेत. ते म्हणजे एमव्ही हॉर्सशू कॅसिनो, एमव्ही प्राइड ऑफ गोवा, एमव्ही कॅसिनो रॉयल, एमव्ही आर्गोसी IV, एमव्ही रॉयल फ्लोटेल आणि एमव्ही लकी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com