Goa Politics: पणजी, फोंडा निवडणुकीवर भाजपने ठरविली रणनीती! गाभा समितीची बैठक, संघटनात्मक हालचालींना वेग

BJP Core Committee Meeting Goa: पणजी महापालिका निवडणूक आणि फोंडा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने गाभा समितीच्या बैठकीत सखोल मंथन केले.
BJP Core Committee Meeting Goa
BJP Core Committee Meeting GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पणजी महापालिका निवडणूक आणि फोंडा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने गाभा समितीच्या बैठकीत सखोल मंथन केले. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर पक्षाच्या कार्यालयात ही बैठक पार पडली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत प्रामुख्याने पणजी महापालिका निवडणुकीतील पक्षाच्या रणनीतीवर चर्चा झाली. मतदानाला अवघे सात दिवस उरले असताना संघटनात्मक पातळीवर कोणत्या उपाययोजना राबवायच्या, यावर निर्णय घेण्यात आले.

पणजी मनपाची निवडणूक अधिकृतपणे पक्षीय चिन्हावर लढवली जात नसली तरी भाजपपुरस्कृत पॅनेल निवडणूक रिंगणात आहे. महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या नेतृत्वाखाली ही लढत होत आहे. पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांनी प्रचारात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे ठरवण्यात आले. आत्तापर्यंत झालेल्या प्रचाराचा आढावा घेण्यात आला तसेच विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरही चर्चा झाली.

BJP Core Committee Meeting Goa
Goa Opinion: महासागरातील किती शिंपले वेचायचे? ‘पाव मात्रेला लय चुकली तर प्रलय होतो'; गावांतील संगीत संमेलनांतून आम्ही घडलो..

दरम्यान, फोंडा मतदारसंघातील पोटनिवडणूक जवळ आल्याने उमेदवार निश्चितीच्या हालचालींना वेग आला आहे. मागील निवडणुकीत अवघ्या ७७ मतांच्या फरकाने भाजपला यश मिळाले होते. त्यामुळे यावेळी विविध सामाजिक व राजकीय घटकांचा परिणाम लक्षात घेऊन उमेदवार निवडण्यावर भर दिला जात आहे.

ही निवडणूक एकतर्फी होणार नाही, असा अंदाज पक्षाने व्यक्त केला आहे. पणजी महापालिका निवडणुकीत विरोधक एकवटल्याची स्थिती लक्षात घेता फोंड्यातही अशीच आघाडी निर्माण झाल्यास त्यास कसे सामोरे जायचे, यावरही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

BJP Core Committee Meeting Goa
Goa Opinion: भविष्यात आपल्या राज्यातून आणखीही 'केसरबाई केरकर' निर्माण होऊ शकतात; संगीत संमेलने

सर्वसमावेशक अर्थसंकल्प मांडणार

बैठकीनंतर दामोदर नाईक यांनी सांगितले की, मुख्यमंत्री लोकाभिमुख अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पातील प्राधान्यक्रम आणि येणाऱ्या निवडणुका या दोन्ही मुद्द्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. तर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, विविध घटकांशी चर्चा करून सर्वसमावेशक अर्थसंकल्प मांडला जाईल. पक्षाच्या सूचनांचा सकारात्मक विचार करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com