
Goa Antibiotics Workers Protest Over Unpaid Salaries and Promotions
मोरजी: तुये येथील गोवा अँटिबायोटिक्स आणि फार्मास्युटिकल्स लि.या कंपनीतील कामगारांना गेल्या दोन महिन्यापासून थकलेला पगार देण्यास कंपनी टाळाटाळ करत असल्याने शिवाय दहा वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना बढती न मिळाल्याच्या निषेधार्थ एकूण १२० कामगारांनी कंपनीच्या फाटकावर निदर्शने केली.
जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा कामगारांनी (Worker) यावेळी दिला. दरम्यान, गोवा फॉरवर्डचे स्थानिक नेते दीपक कलंगुटकर यांनी या कामगारांची आणि अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर कलंगुटकर यांनी पत्रकारांकडे बोलताना कंपनीचे वरिष्ठ अधिकारी या कामगारांना काहीच किंमत देत नसून पगाराविषयी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. न्याय न मिळाल्यास हे कामगार रस्त्यावर उतरणार असून गोवा फॉरवर्ड (Goa Forward) या विरोधात विधानसभेतही आवाज उठवेल, असे सांगितले.
कामगारांनी सांगितले की, कंपनीकडून पगार वेळेवर मिळावा आणि पात्र कामगारांना बढती द्यावी, यासाठी वारंवार मागणी केली जात आहे. मात्र कंपनी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा दावा केला.
कामगारांनी सांगितले की, आम्ही दररोज वेळेवर काम करतो. कंपनीसाठी मेहनत घेतो. तरी आम्हाला महिन्याचा पगार वेळेवर मिळत नाही. मात्र अधिकाऱ्यांना नियमित वेळेवर पगार कसा काय मिळतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.