Chhatrapati Shivaji Maharaj Digital Museum Ponda, Goa Dainik Gomantak
गोवा

शिवबा राजं! फोंड्यात उभं राहणार शिवरायांवर आधारित संग्रहालय, पर्वरीत टाऊन स्क्वेअर प्रकल्प; 188 कोटी मंजूर

Chhatrapati Shivaji Maharaj Digital Museum In Goa: निधीच्या माध्यामातून जागतिक मानकांनुसार प्रतिष्ठित पर्यटन केंद्रे विकसित करण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे.

Pramod Yadav

Chhatrapati Shivaji Maharaj Digital Museum Ponda Goa, Porvorim Town Square Project

पणजी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित डिजिटल संग्रहालय फोंड्यात उभारलं जाणार आहे. तर, पर्वरीत टाऊन स्क्वेअर प्रकल्प केला जाणार आहे. यासाठी केंद्राकडून एकूण १८८ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.

केंद्रीय पर्यटन खात्याकडून या प्रकल्पासाठी मोठी निधी मंजूर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फोंड्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित डिजिटल संग्रहालयासाठी ९७.४७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर, पर्वरीतील टाऊन स्क्वेअर प्रकल्पासाठी ९०.७४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

भारतातील पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 23 राज्यांमधील 40 प्रकल्पांना राज्य/केंद्रशासित प्रदेशांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य (SASCI) योजनेंतर्गत मान्यता दिलीय. निधीच्या माध्यामातून जागतिक मानकांनुसार प्रतिष्ठित पर्यटन केंद्रे विकसित करण्याचा उद्देश आहे.

3,295.76 कोटी किमतीचे हे प्रकल्प स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासह पर्यटनाद्वारे रोजगार निर्माण करतील, असा विश्वास केंद्राने व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरे गुन्हेगार मोकाट, आमच्या मुलांना अटक का केली? नरकासूर प्रकरणी होंडा ग्रामस्थ एकवटले, पोलिसांना निलंबित करण्याची मागणी

ना भाकरीचा प्रश्न सुटला ना जीव वाचला; कोकण रेल्वेखाली सापडून दोन्ही पाय तुटले, ओडिशाच्या तरुणाचा गोव्यात मृत्यू

IND W vs NZ W: न्यूझीलंडविरुद्ध भारतीय ओपनर्सचा डबल धमाका! स्मृती मानधना-प्रतिका रावलने ठोकले शतक, रचला नवा इतिहास! VIDEO

Ind vs Aus 2nd ODI: 17 वर्षानंतर Adelaide मध्ये हरली टीम इंडिया! 2-0 ने मालिका ऑस्ट्रेलियाच्या खिशात

Goa Politics: दिल्लीतून पैसे घेतल्याची एक तरी सेटिंग सिद्ध करून दाखवा, RGP पक्षच बंद करू; तुकारामांचे 'मायकल'ना ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT