St Francis Xavier Goa
पणजी: गोंयचा सायब अशी ओळख असणाऱ्या सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांची DNA चाचणी करण्याची मागणी हिंदू रक्षा महाआघाडीच्या सुभाष वेलिंगकर यांनी केलीय.
वेलिंगकरांच्या या मागणीच्या मुद्याने राजकीय रंग घेतला असून, सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. सुरुवातीला आलेमाव यांनी वेलिंगकरांविरोधात पोलिस तक्रार दाखल केल्यानंतर आता आमदार विजय सरदेसाई, वॉरन आलेमाव आणि भाजपचे गिरीराज पै वेर्णेकर यांनी देखील याप्रकरणी भाष्य केले आहे.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव आणि त्यांची कन्या वालांका आलेमाव यांनी कोलवा पोलिस स्थानकात सुभाष वेलिंगकर यांच्याविरोधात तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली. त्यापाठोपाठ वॉरन आलेमाव यांनी देखील पोलिसांत तक्रार दाखल करत कारवाईसह वेलिंगकर यांच्या अटकेची मागणी केली.
वेलिंगकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील कॅथलिक समाजाच्या भावना दुखावल्याचे आलेमाव यांनी म्हटले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना देखील पत्र पाठवून या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी केलीय.
आमदार विजय सरदेसाई यांनी याप्रकरणी सरकारला प्रश्न विचारत आता तुमच्या भावना दुखावल्या नाहीत का? आणि दुखावल्या असतील तर कारवाई का नाही केली जात? थेट सवाल केला आहे.
भाजपकडून काँग्रेसवर टीका
भाजपने देखील या वादात उडी घेत काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस नेहमी हिंदूंना लक्ष्य करते, असे प्रवक्त गिरीराज पै वेर्णेकर म्हणाले.
धार्मिक सलोखा राखणे हे सर्व समाजांची जबाबदारी आहे. काँग्रेस मतांसाठी केवळ हिंदूंना लक्ष्य करते. डिएनएच्या बाता करणाऱ्या आलेमाव यांचा डिएनए सर्व गोवेकरांना माहिती आहे, असे वेर्णेकर म्हणाले.
तसेच, त्यांनी (सुभाष वेलिंगकर) यांनी केलेल्या विधानावर भाजप प्रतिक्रिया देणार नाही. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांनी पोलिसांत तक्रार द्यावी, असेही वेर्णेकर पुढे म्हणाले.
दरम्यान, पुढील महिन्यात फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांची प्रदर्शनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या भव्यदिव्य कार्यक्रमासाठी भाजप सरकार जोरदार तयारी करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील लोकसभा प्रचारादरम्यान गोव्यातील या महोत्सवाबाबत भाष्य करत सरकारला या सहकार्य करत असल्याचे नमूद केले होते.
केंद्र सरकारकडून यासाठी आर्थिक मदत मिळाल्याची माहिती नाही, तसेच केंद्रीय अर्थसंकल्पात देखील यासाठी तरदूत करण्यात आलेली नाही. पण, या कार्यक्रमासाठी ४०० कोटींचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती आहे. अशात वेलिंगकरांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.