Digambar kamats works hampered the development of Margao: Babu Ajgaonkar Dainik Gomantak
गोवा

दिगंबर कामतांमुळेच मडगावचा विकास खुंटला: बाबू आजगावकर

गेल्या 27 वर्षात दिगंबर कामत यांनी मडगावात काहीच केले नसल्याची टीका आजगावकर यांनी केली.

दैनिक गोमन्तक

सासष्टी: गेल्या 27 वर्षात दिगंबर कामत यांनी मडगावात काहीच केले नाही. त्यांच्यामुळेच या शहराचा विकास खुंटला, अशी टीका उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी केली.

बाबू आजगावकर (Babu Ajgaonkar) यांनी न्यू मार्केटमधील पिंपळकट्टयावर जाऊन भाजप मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व चाहत्यांच्या उपस्थितीत श्री चरणी नारळ अर्पण केला. आगामी निवडणुकीत विजयासाठी आशीर्वाद घेतले. त्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की मडगावचे काम करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य समजतो. आपला मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर पूर्ण विश्र्वास आहे. 

मडगावची (Margao) उमेदवारी मिळेल, याचा आपण कधी विचारच केला नव्हता. पण माझी जन्म व कर्मभूमी असलेल्या मडगावात मला भाजपने (BJP) उमेदवारी देऊन मठग्रामस्थांची सेवा करण्याची संधी दिली. पक्षाने जो विश्र्वास दाखवला तो सर्व कार्यकर्त्यांच्या व मतदारांच्या मदतीने सार्थ करुन दाखवेन,असेही आजगावकर म्हणाले.

गेल्या 27 वर्षांत जो विकास झाला नाही तो या पुढे होईल. पार्किंग, कचरा, वाहतूक समस्या सुटतील. मडगावकर सर्वांपेक्षा जास्त कर भरतात, मात्र त्यामानाने मडगावचा विकास झाला नाही, असेही आजगावकर म्हणाले.

मडगावची सध्याची स्थिती पाहता हे शहर आपले, असे म्हणावे, असे दिसत नाही. जर मडगावचा सर्वांगीण विकास पाहिजे तर सर्व मडगावकरांनी मतभेद विसरून एकत्र येणे व एकजुटीने निवडणुकीस सामोरे जाणे महत्वाचे आहे ,असेही आजगावकर म्हणाले.

यावेळी त्यांच्यासमवेत देश प्रभुदेसाई, बिपीन कंटक, रुपेश महात्मे, सुबोध गोवेकर, सुनील नाईक, शर्मद रायतुरकर, रंजिता पै, चंदन नायक उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'पक्षात यायचं तर दरवाजे उघडे आहेत', भाजप प्रदेशाध्यक्षांनी उडवली खिल्ली; काँग्रेसच्या रणनीतीला दिलं झणझणीत उत्तर

IND vs SA: कसोटी मालिकेत टीम इंडियाचा सूपडा साफ! व्हाईटवॉशनंतर गौतम गंभीरला म्हणाला, 'पराभवाची जबाबदारी सगळ्यांची...'

WTC Points Table: भारताच्या 'क्लिन स्वीप'चा पाकिस्तानला फायदा, WTC पॉइंट टेबलमध्ये उलटफेर; दक्षिण आफ्रिकेने मारली बाजी

रस्ते खोदाल तर याद राखा!! PM मोदींच्या दौऱ्यासाठी दक्षिण गोव्यात रस्ते खोदकामावर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल

Baina Dacoity: 6वा मजला, 6 दिवस, 6 आरोपी! 'गोवा पोलिसांनी करून दाखवलं'; बायणा दरोडा प्रकरणी पीडित कुटुंबाला मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT