गोवा: राज्यात भाजपच्या कारकीर्दीत भ्रष्टाचार आणि घोटळ्याची प्रकरणे वाढतच आहेत. मागील काही वर्षात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. मेघायलयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी भाजप (Goa BJP) आरोप भ्रष्टाचार आणि घोटाळ्याचा आरोप केला आहे. (Former Governor Satya Pal Malik accuses BJP about scam)
भाजपचे राज्य आल्यापासून राज्यात भ्रष्टाचार (Corruption) आणि जमीन घोटाळ्याची प्रकरणे वाढली असून, या विरोधी आवाज उठवल्यामुळे माझे पद काढून घेतले आहे, भ्रष्टाचाऱ्याच्या मध्यमातून भाजप आपली झोळी भरत असल्याचा आरोप मेघायलयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला.
ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) जबाबदरीपासून पळ काढत असून मागील दहा वर्षात राज्यात तब्बल 128 जमीन घोटाळा प्रकरणाच्या तक्रारी रजिस्टर झाल्या आहेत. भाजप कडून राज्यात सगळीकडे भ्रष्टाचार चालू आहेतच, म्हणूनच जमीन घोटाळा संबंधी भाजप सरकार विरोधात आवाज उठवण्याची वेळ आता आली आहे. तसेच राज्यातील भ्रष्टाचार आणि घोटाळे थांबवण्यासाठी भाजप सरकारला हटवणे हा एकमेवच उपाय आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.