Digambar Kamat Margao Dainik Gomantak
गोवा

Margao Elections: 'मडगाव पालिका निवडणुकीसाठी उद्याही तयार'; मंत्री कामतांचे प्रतिपादन Watch Video

Digambar Kamat: निवडणुका उद्यासुद्धा जाहीर झाल्या तर त्यास सामोरे जाण्यास आपली पूर्ण तयारी असल्याचे मंत्री दिगंबर कामत यांनी मडगावात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: नगरपालिकेच्या निवडणुका उद्यासुद्धा जाहीर झाल्या तर त्यास सामोरे जाण्यास आपली पूर्ण तयारी असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी मडगावात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

या वेळी मडगावात २५ ऐवजी २७ प्रभागांत निवडणूक होईल. हा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र कोणते प्रभाग आरक्षित केले जातील ते सर्वस्वी राज्य निवडणूक आयोग ठरवेल. त्यात सरकार हस्तक्षेप करणार नाही, असेही कामत यांनी स्पष्ट केले.

अजून निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शक नियम निश्र्चित झालेले नाही. एकदा आरक्षण ठरले त्या नंतर उमेदवार निश्र्चित केले जातील. विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी द्यावी की नाही, त्याचा निर्णय नंतर घेतला जाईल. पण उमेदवारांची निवड योग्यता व गुणवत्तेवर केली जाईल. हे करताना आपण आपल्या कुटुंबाचाही विचार केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. नगरपालिका व ग्रामपंचायत निवडणुका पक्षीय होणार नाहीत असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय अर्थसंकल्पाचा गोव्याला फायदा!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी जो संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे त्याचा गोव्याला विविध क्षेत्रांमध्ये फायदा होणार आहे. विकसित भारताचे लक्ष्य बाळगूनच हा अर्थसंकल्प तयार करण्यात आल्याचे ‘साबांखा’ मंत्री दिगंबर कामत यांनी आज सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT